Download App

नागपुरमध्ये हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर जात पंतप्रधान मोदींनी केलं अभिवादन, सरसंघचालकही उपस्थित

नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख

  • Written By: Last Updated:

Prime Minister Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरमध्ये दाखल झाले आहेत.  त्यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सोबतच पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार आहेत. यावेळी सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्‍याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.

‘एक है तो सेफ है’ ची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर आज पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आले आहेत. निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी दिलेली “एक है तो सेफ है” ची घोषणा रेशीमबाग परिसरातील प्रत्येक बॅनर आणि होर्डिंग वर प्रकर्षणाने दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलं आहे आणि त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर एक है तो सेफ है ही घोषणा दिसून येत आहे.

भाजपचं सर्वोच्च नेतृत्व आज संघस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या नागपूर दौऱ्याची सुरुवात भाजपसाठी पितृ संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरातून करणार आहे. भाजपचं सर्वोच्च नेतृत्व जेव्हा संघस्थानी पोहोचत आहे, तेव्हा ते संघ आणि भाजप यांच्या संबंधांसाठी महत्त्वपूर्ण दिवस तर आहेच. सोबतच देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर ही या पंधरा मिनिटांच्या भेटीचे अनेकविध परिणाम येणाऱ्या दिवसात होणार आहे. पंतप्रधानांच्या ऐतिहासिक संघ भेटीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी संपूर्ण रेशीम भाग परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

follow us