Download App

Lok Sabha : ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

Lok Sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली.

Ratnagiri Lok Sabha 2024: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024) शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) आणि भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली आहे. मात्र एकूण नऊ उमेदवार यावेळी रिंगणात होते. या लढतीत आता नेमकं कोण बाजी मारणार? याचे चित्र ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचाच उमेदवार! नारायण राणे यांनी ठोकला दावा, शिवसेनेची कोंडी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ ठिकाणी महायुतीचे आमदार आणि त्यापैकी दोघे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे कागदावर तरी महायुतीमध्ये चांगलीच वरचढ पाहायला मिळाली. तिसऱ्या टप्पायात झालेल्या मतदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाने जोरदार कामगिरी बजावली आहे. या मतदार संघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सुरुवातीपासून राणे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र त्यांचे कार्यकर्ते याविषयी नाराज होते.

दुसरीकडे, या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव यांनी राऊत यांच्या प्रचारासाठी जोरदार काम सुरू केले. यामुळे आपल्या स्थानाला मोठा धक्का बसणार या जाणिवेने अनेकजण सावध राहिले आणि शेवटच्या काही दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच कामाला लावून आपल्या हक्काच्या मतदार गावात थेट गाठले. भाजपा आणि राणे यांनी देखील त्यांना मोठी साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघातून राऊत यांना मिळणारी आघाडी कमी झाली असण्याचा अंदाज लावला.

महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित होते. राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या दृष्टीने स्वतःच्या पातळीवर मोठा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना कितपत साथ दिली, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत तालुक्यातील राजकारणात माहीर असलेले त्यांचे मोठे भाऊ किरण सामंत देखील दिवसभर ‘नॉट रिचेबल’ राहिल्याने कार्यकर्त्यांच्या मनात चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. त्याचाही फटका राणे यांना बसणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी राजापूर या मोठा मतदारसंघ ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी खिंड लढवत होते. त्यांच्यापाठोपाठ राज्य सरकारने प्रतिबंधक खात्याचे शुक्लकाष्ट लावले असल्याने पक्षाच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. त्यामुळे राणे यांच्याशी जुने संबंध असले तरी साळवी यांनी या निवडणुकीमध्ये जोरदार काम केल्याचा अंदाज मानला आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे इच्छुक अविनाश लाड यांनी मोठ्या प्रमाणात जोर लावल्याने या मतदारसंघामध्ये राऊत यांना आघाडी मिळेल, अशी अपेक्षा मानली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली हा राणे कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे. कारण, तिचे त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार म्हणून उत्तम प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे येथून सर्वांत जास्त अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हावी असे वातावरण निर्माण झालेले होते. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील एकमेव महायुतीचे मंत्री आहेत. त्यामुळे राणे यांना मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा राणे याना आहे, पण जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजन तेली, केसरकर आणि राणे यांचे एकमेकांशी संबंध खराब आहेत. शिवाय, गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले केसरकर आणि राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्वार्थासाठी एकमेकांना मिठ्या मारतात. या गोष्टी लोकांना पटत नाहीत. या मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे सुमारे ३५ हजार ख्रिश्चन मतदार आहे.

Baramati Loksabha : आधी पैशांचा, गुंडांचा वापर नव्हता पण..,; रोहितदादांनी घडलेलं सांगितलं

देशातील बदललेल्या राजकीय- सामाजिक वातावरणात तो भाजपाला मत देण्याची शक्यता कमी आहे. पुढे आहे कुडाळ-मालवण या लहान विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक प्रसंगी जीवावर उदार होऊन राणे यांच्याशी कौटुंबिक-राजकीय लढाई गेली सुमारे तीन दशकापासून लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून ते राऊत यांना सर्वात मोठ्या मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. या सहा मतदारसंघांत झालेल्या मतदानाच्या शेवटचा आकडा हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघ लहान असल्याने टक्केवारीमध्ये मोठी वरचढ दिसणार आहे.

मात्र या दोन जिल्ह्यांमधील मतदानाची आकडेवारी बघितली गेली तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४ लाख ३९ हजार ४१९ मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. म्हणजे , रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २८ हजार मतदान जास्त झाल्याचे पाहायला मिळाले. या चुरशीच्या लढतीतील भाजपाचे उमेदवार राणे यांनी, ‘विजयाचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र ४ जूनला त्याचा अनुभव येईल,’ असे विरोधकांनी उत्तर दिले आहे, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राऊत म्हणाले की, याआधी आपण दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येऊ, असा अंदाज लावला जात आहे. पण झालेले मतदान लक्षात घेता ही आघाडी आणखी जास्त राहील, असा अंदाज लावला जात आहे.

follow us