Download App

Engineer Suicide : धक्कादायक! कामाचा दबाव वाढत गेला; सॉफ्टवेअर इंजिनिअरने संपवलं जीवन

काही दिवसांपुर्वीच एक बातमी आली होती की चार्टर्ड अकाउंटंट एका मुलीने कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली. अज अशीच बातमी आली आहे.

  • Written By: Last Updated:

Software Engineer Suicide Work Stress : चेनईतील एका 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने कामाच्या अत्याधिक दबावामुळे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी विजेचा शॉक घेऊन आपले जीवन संपवलं. (Work) त्यांच्या पत्नीला ते घरात विजेच्या तारांमध्ये अडकलेले स्थितीत आढळून आले. तमिळनाडूच्या थनी जिल्ह्याचे रहिवासी असलेले कार्तिकेयन चेनईमध्ये आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. 15 वर्षांपासून ते एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते नैराश्याच्या आजारावर उपचार घेत होते. कामाच्या दबावामुळे ते मानसिक त्रासात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात तिसरी आघाडी! जयंत पाटलांची बच्चू कडूंना खुली ऑफर, म्हणाले..,

कार्तिकेयनच्या आत्महत्येच्या वेळी ते घरी एकटेच होते. त्यांची पत्नी के. जयराणी सोमवारपासून बाहेर गेली होती आणि आपल्या मुलांना आईकडं सोडलं होतं. गुरुवारी रात्री परत आल्यानंतर घराचा दरवाजा न उघडल्याने तिने दुसरी चावी वापरून घरात प्रवेश केला, तेव्हा तिला कार्तिकेयन मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. कामाच्या दबावामुळे आलेल्या नैराश्यामुळे कार्तिकेयनने आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

यापूर्वी 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अ‍ॅना सेबास्टियन पेरायल नावाच्या युवतीने कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला होता. अन्नाच्या आईने आरोप केला आहे की, कामाच्या ताणामुळे तिच्या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. या प्रकरणानंतर केंद्रीय कामगार मंत्रालयाने तपासाची सुरुवात केली आहे. अ‍ॅनाच्या आईने लिहिलेल्या पत्रात, तिच्या मुलीला वारंवार कामाच्या अत्याधिक मागण्या केल्या जात असल्याचं सांगितलं आहे. कामाच्या तानामुळे आज काम करणाऱ्या तरुणाईच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

पुण्यात 26 वर्षीय मुलीचं निधन; कामाला झोकून दिलेल्यांची झोप उडवणारं आईचं पत्र वाचलंत का?

अनेक कंपन्यांमध्ये कामाच्या दबावामुळे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समोर येत आहेत. कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे प्रत्येक कंपनीचे कर्तव्य आहे. अ‍ॅना सेबास्टियनच्या आईने तिच्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे आणि या विषयावर चर्चा सुरू केली आहे. कॉर्पोरेट कामाच्या विषारी वातावरणामुळे अनेक तरुणांना गंभीर मानसिक त्रास होत आहे. दरम्यान, कार्तिकेयन यांच्या दुर्दैवी मृत्यूने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की कामाच्या दबावाने मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात. या घटनेनंतर कर्मचार्‍यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे.

follow us