Download App

RSS Workers : आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना केली अटक

कर्नाटकमध्ये आरएसएस कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला असून संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Police Raid on RSS Office : पोलिसांनी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या (RSS) कार्यालयावर छापा टाकून संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपने (BJP) सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’वर पोस्ट केली आहे की, पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर रात्रभर छापा टाकला आणि संघटनेच्या प्रचारकांना मारहाण केली, हे अक्षम्य आहे.

Sharad Pawar: शरद पवार 30 वर्षांनंतर लालबागचा राजाच्या चरणी, जावई आणि नातीसोबत घेतलं दर्शन, पाहा फोटो

संघाच्या कार्यालयावर विनाकारण झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करतो, असं भाजपने म्हटलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात अराजकता वाढली आहे. ज्यामुळे हिंदू भीतीच्या वातावरणात आहेत.

पोलिसांचा गैरवापर करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस हिटलरचं राजकारण करत आहे. देशभक्त स्वयंसेवकांवर अत्याचार केले जात आहेत. नागमंगला दंगलीत हिंदू कार्यकर्त्यांनी आरएसएस नेत्यांच्या अटकेचा निषेध केला.

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

follow us