Download App

संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान; सीताराम येचुरी यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय

सीताराम येचुरी यांचा मृतदेह नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय येचुरी कुटुंबियांनी घेतलायं.

Sitaram Yechury Passes Away : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनानंतर येचुरी कुटुंबियांकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. सीताराम येचुरी यांचा मृतदेह नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान केला आहे.

सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी न्युमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, 12 सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांनी येचुरी यांचा मृतदेह एम्स रुग्णालयाला अभ्यास आणि संशोधनासाठी दिला असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने दिलीयं. सीपीएम सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मित्रपक्षांकडूनच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; वडेट्टीवारांचा मोठा दावा

तेव्हापासून ते लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. काही दिवसापूर्वी त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती मात्र नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियासारख्या छातीत संसर्ग झाला होता. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करत होती. सीताराम येचुरी यांच्या पश्चात पत्नी सीमा चिश्ती येचुरी आणि मुले अखिला आणि आशिष येचुरी असा परिवार आहे.

मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला; मृत्यूचं धक्कादायक कारण समोर..

दरम्यान, सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता.

सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.

follow us