Download App

राज्यसभेसाठी 9 नेत्यांची नावे दिल्लीत, पंकजा मुंडेंना संधी मिळणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

Image Credit: Letsupp

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे. राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. यातच आता भाजपात काहीशा दुर्लक्षित झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवणार का? या माध्यमातून त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्याबरोबरील भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही. पंकजांना कोणतं पद द्यायचं, कोण राज्यसभा किंवा लोकसभेत जाईल याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात असे फडणवीस म्हणाले.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या इशाऱ्यानंतर भाजप अलर्ट; महाजन म्हणाले, त्यांचं वक्तव्य 

दरम्यान, भाजपकडून ज्या उमेदवारांच्या नावांची यादी पाठवण्यात आली आहे. त्यात नारायण राणे, विनोज तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. आता या नऊ नेत्यांपैकी कुणाला ग्रीन सिग्नल मिळणारे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यातील सहा जागांपैकी तीन जागा भाजप लढवील. एक जागा शिवसेना आणि एक जागा अजित पवार गटाला दिली जाईल. चौथी जागा भाजप लढवील याची शक्यता नाही. जर महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर मग आपणही चौथा उमेदवार द्यायचा असे भाजपाचे ठरले आहे. निवडणुकीआधी काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपात आला तर भाजप चौथी जागा लढेल अशी चर्चा आहे.

Devendra Fadanvis : राजकीय कुटुंबातील लोकांनीही राजकारणात यावं पण… फडणवीसांनी दिला सल्ला

विधानसभेतील पक्षीय बलाबल

राज्याच्या विधानसभेत सध्या भाजप 104, राष्ट्रवादी (अजित पवार) 42, शिवसेना (एकनाथ शिंदे) 40, काँग्रेस 45, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 11, बहुजन विकास आघाडी 3, सपा, एमआयएम, प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2, मनसे, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13 असे संख्याबळ आहे.

follow us

वेब स्टोरीज