Pankaja Munde : विजयादशमीनिमित्त काल सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melawa) भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या पक्षात जाण्यााइतपत मी लेचीपेची नाही, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या आता भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल विचारले. पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केलं आहे ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्यांचं भाषण ऐकलेलं नाही. ऐकल्यानंतर यावर अधिक बोलता येईल असे उत्तर महाजन यांनी दिले.
Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! आजपासून जरांगे पाटील पुन्हा मैदानात, ठिकठिकाणी आंदोलन
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?
माझ्याविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतं या पक्षात चालले तर कोणी म्हणतयं या पक्षात, पण पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही पदं न देता निष्ठा काय असते ते जनतेला विचारा. निवडणुकीत मी पडले तर पडले पण ब्रम्हा, विष्णू महेशसुद्धा युद्धात हरले आहेत. या त्रिदेवांनाही संकट आहे तर युद्धाला आपण का नाही तयार राहणार? हजार वेळा हरलात तरी लोकं तुमच्या गळ्यात सन्मानाने हार घालतात. माझी निष्ठा एवढी लेचीपेची नसल्याचंही मुंडे यांनी काल दसरा मेळाव्यात ठणकावून सांगितलं होतं.
शिवशक्ती यात्रेनंतर वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाली. त्यानंतर जनतेने मला तब्बल 11 कोटी रुपये गोळा करुन दिले तेव्हा मला समजलं की मी त्यांची नाहीतर तुमची कर्जदार आहे. आता माझं सर्वस्व जनताच. जिथं जनतेचं भल तिथेच पंकजा मुंडे नतमस्तक होणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले होते.
‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच डोक्यावर घेता’; CM शिंदेची जळजळीत टीका
तरीही त्यांना सोडणार नाहीच
अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यांचेही सरकार होते. त्यांचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे सुद्धा पहावं. मातोश्रीवर त्या ललित पाटीलचा प्रवेश झाला होता. असं असताना आमच्यावर बेछुट आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही काहीही बोलला तरी लोकांना कळतं. अमली पदार्थांचा विषय मुळापासून संपविण्यासाठी आता सरकारने काम सुरू केले आहे. अमली पदार्थांची तस्करी किंवा व्यवसायात कुणी राजकीय पदाधिकारी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा महाजन यांनी दिला.