Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची परंपरा खंडित करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘आमचं ऑपरेशन कळत नाही अन् कळलं तर.. दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चा फडणवीसांनी टोलवल्या
भाजपचा विरोध तरीही शिंदेंनी पाटलांनाच निवडलं
लोकसभांचं बिगुल वाजण्यापूर्वी म्हणजेच साधारण दोन वर्षांपासून हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात होती. ज्यावेळी 2024 च्या लोकसभांच्या तारखांची घोषणा झाली. त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चांवेळी हेमंत पाटलांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदेंनी भाजपची नाराजी अंगावर घेत हेमंत पाटलांनाच उमेदवारी देण्यात यश मिळवलं आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे.
मोठी बातमी : अजितदादांचं टेन्शन संपलं; शिवतारेंची बारामती मतदारसंघातून माघार
आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ही जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडण्याची मागणी केली होती. मात्र, ठाकरेंनी अष्टीकरांना आणि शिंदेंकडून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता हिंगोली लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन गट निवडणूक रिंगणात दिसणार असून, वंचितकडून या ठिकाणी काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात , वसमत, कळमनुरी या विधानसभा तसेच नांदेड जिल्हयातील हदगाव व किनवट तर यवतमाळ जिल्हयातील उमरखेड या विधानसभा मतदार संघाचा समावेश असून, 2009 मतदान केंद्रावरून 18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
“तुमच्यासाठी दारचं काय खिडक्याही उघड्या!” तिसऱ्या आघाडीसाठी वंचितला जुन्या मित्राचा खास प्रस्ताव
हिंंगोली लोकसभा मतदार संघातील 35 वर्षातील खासदार
सन 1989-91 : उत्तमराव राठोड (काँग्रेस), सन 1991-96 : विलास गुंडेवार (शिवसेना), सन 1996-98 : ॲड. शिवाजी माने (शिवसेना), सन 1998-99 : सुर्यकांता पाटील (काँग्रेस), सन 1999-2004 : ॲ्ड. शिवाजी माने (शिवसेना), सन 2004-2009 : सुर्यकांता पाटील (राष्ट्रवादी), सन 2009-2014 : सुभाष वानखेडे (शिवसेना), सन 2014-19 : ॲड. राजीव सातव (काँग्रेस), सन 2019 : हेमंत पाटील (शिवसेना).