Download App

तुमच्या छाताडावर पाय रोवून ठाकरे बंधू…., संजय राऊतांनी सांगितलं मनसे शिवसेनेच्या युतीचं ‘गणित’

या बैठकीत नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी संजय राऊत

  • Written By: Last Updated:

राज्यात येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुका जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. (MNS) आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र महापालिका लढवणार असल्याचं बोलल जात आहे. याच पार्श्वभूमीवर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी संजय राऊत यांनी कोणचा महापौर होईल, याबद्दलचीही माहती दिली.

कोणी काहीही म्हणत असलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नाते अत्यंत घट्ट झालेले आहे. कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी गोष्ट आता खूप पुढे गेली आहे. माघारीचे दोर आता नाहीत. प्रकरण फार पुढे गेले आहे. कोणीही कोणत्या मेळाव्यात काय वक्तव्य केलं आणि नंतर पाहू हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावर पाय रोवून ठाकरे बंधू याक्षणी मनस्थितीत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

मनसे शिवसेना युतीच्या हालचालींना वेग; राज ठाकरे थेट मातोश्रीवर, नक्की काय घडतय?

कालं ते नक्कीच आमच्या एका कौटुंबिक सोहळ्याला एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले. दोघात राजकीय चर्चा झाली. मुंबईसह महाराष्ट्रात २७ महापालिका आहेत. हा खेळ आहे का, अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर चर्चा होणं गरजेचे आहे. प्रत्येक महापालिकेची स्थिती ही वेगळी आहे. प्रत्येक महापालिका हद्दीत राजकीय इतर परिस्थिती वेगळी आहे. कुठं आरक्षण आहे, कुठं पॅनल सिस्टिम आहे, या सर्व गोष्टींवर आमची चर्चा होत आहे.

प्रत्येक महापालिकेबद्दल दोन्हीही पक्षाचे प्रमुख चर्चा करत आहेत. आम्ही असावं असं नाही. स्थानिक पातळीवर जे प्रमुख नेते आहेत त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं. कालच्या सोहळ्याला सुप्रिया सुळेही होत्या. त्यामुळे मविआ आहेच. ते कुठेही सोडून गेलेले नाहीत. महाविकासआघाडीचे अस्तित्व कायम आहे. तिची भूमिका, काम आणि महत्त्वं कायम आहे. महापालिका निवडणुकीत कुठे आपण कोणाकोणला सामावून घेऊ शकतो हेही पाहत आहोत.

त्याचबरोबर मनसे आम्हाला कुठं कुठं सामावून घेऊ शकते. ही गणित वेगवेगळी आहेत. ती तशीच राहणार आहेत. त्यात बदल होणार नाही. कुठे फक्त शिवसेना, कुठे फक्त मनसे, कुठे मनसे आणि शिवसेना असं असेल. त्यानुसार फॉर्म्युला ठरेल, असंही संजय राऊत म्हणाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकमत आहे. याप्रमुख महापालिकेवर काम करावं लागेल. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा होईल. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले.

follow us