Download App

मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह मुख्यमंत्री राहणार की नाही? ज्योतिरादित्य सिंधिया नेमकं काय म्हणाले?

Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं (BJP)विजयश्री खेचून आणला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. या शर्यतीत भाजपचे अनेक दिग्गज नेते आहेत. या विजयावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia )यांच्या वक्तव्यावरुन शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदी राहावं, अशीच त्यांची इच्छा असल्याचं दिसून येत आहे.

Rajasthan Election : राजकुमारीची जादू कायम! दणदणीत विजयासह आता CM पदासाठी शर्यतीत

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आमचे डबल इंजिनचे सरकार काम करत आहे.

कोणत्या राज्यात भाजप आणि काँग्रेसची सत्ता? चार राज्यांच्या निकालाने चित्र बदलले

मध्यप्रदेशबद्दल बोलायचं झालं तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan)यांच्या नेतृ्त्वाखाली सेवा आणि सुशासन करणारं भाजप सरकार आहे. त्यामुळे जनतेचा पूर्ण आशिर्वाद भाजपवर असणार आहे.

मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांची धोरणं ही जनतेच्या हिताची आहेत. त्याचा पुरेपूर फायदा भाजपला झाला. हा जनादेश कोणत्याही पक्षाच्या फायदा किंवा तोट्याचा विषय नाही. लोकशाहीमध्ये जमिनीशी जोडलेल्या आणि सर्वांसाठी काम करणाऱ्या पक्षावर जनता विश्वास ठेवते, हे स्पष्ट झाले असल्याचे यावेळी सिंधिया म्हणाले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकवटला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आज निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. आपण यापूर्वीच सांगितले होते की, भाजपला फक्त बहुमतच नाही तर स्पष्ट बहुमत मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा मोठा परिणाम झाला आहे. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहे. याचे संपूर्ण श्रेय शिवराज सिंह चौहान यांना जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काय आहे लाडकी बहीण योजना?
लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा उद्देश मध्य प्रदेशमधील मुलींची संख्या वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला दरमहा 1,000 रुपये दिले जातात. मुलीचे वय 23 वर्षे होईपर्यंत ही रक्कम दिली जाते. याशिवाय मुलीला लग्नाच्या वेळी 51 हजार रुपये एकरकमी दिले जातात.

त्याचवेळी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग दोन दिवसांपासून भाजपवर टिका करत होते, त्यावर मंत्री ज्योतिरादित्य सिधिया म्हणाले की, त्यांनी केलेल्या टिकेचं मी स्वागत करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.

Tags

follow us