Download App

MP Election 2023 : ज्योतिरादित्य सिंधियांचे ‘विमान’ पुन्हा मध्य प्रदेशात ? आत्याच्या मतदारसंघातून तिकीट

  • Written By: Last Updated:

MP Election 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश (MP Election) या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंदी पट्ट्यातून पुन्हा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपसाठी दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या ‘चाणक्यां’कडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपने सहा खासदारांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. आता केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनाही राज्यात पाठविण्याचे हालचाली सुरू आहेत.

विशेष म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांची आत्या कॅबिनेट मंत्री यशोधराराजे यांच्या शिवपुरी (Shivpuri) मतदारसंघात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान यशोधराराजे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे आज जाहीर केले आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया राज्यात आल्यास तेच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही असू शकतात.


Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान

मध्य प्रदेशसाठी भाजपकडून दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यासह, सात खासदारांच्या नावाचा समावेश आहे. मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, सतनामधून गणेश सिंह, जबलपूर पश्चिममधून राकेश सिंह, गदरवारामधून खासदार उदय प्रताप सिंह, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवास मतदारसंघातून फग्गन सिंह कुलस्ते यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला

आता तिसऱ्या यादीत कुणाचे नावे असतील याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही विधानसभेत तिकीट मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि मध्य प्रदेशमध्ये क्रीडा मंत्री असलेल्या यशोधराराजे सिंधिया या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आत्या आहेत. वसुंधराराजे राजस्थान निवडणुकीतून साइडलाइन झाल्या आहेत. तर यशोधरराजे याही प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान मध्य प्रदेशसाठी उमेदवारांची तिसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक ऑक्टोबरला भोपाळला जाणार आहे. त्यानंतर तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिवराजसिंह चौहानांची धाकधूक
दोन्ही उमेदवारी यादीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांचे नाव नाही. तर मागील वेळी पहिल्याच यादीत शिवराजसिंह चौहान यांचे नाव होते. परंतु यंदा दोन्ही यादीत नाव आलेले नाही. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांना पुन्हा राज्यात आणले जात आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज