Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला

Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये  लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या ‘घाना’ दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. नार्वेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी तेथे लोकशाहीवर बोलणार आहेत. मात्र इथे महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे. अशी टीका यावेळी राऊत यांनी नार्वेकरांवर केली आहे.

निकाल उशीरा लावण्यासाठी अध्यक्ष ‘घाना’ला…

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर असा देखील आरोप केला की, ते मुद्दाहून घानाला जात आहेत. जेणे करून राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाला उशीर लागावा असा त्यांचा यामागे हेतू आहे. असं राऊत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, ‘घाना या शहरात देखील लोकशाही अस्थिर असते. विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत. मात्र ते महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून जात आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तारखांवर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवत आहेत.’

Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली

दरम्यान ‘सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकाल आठ दिवसांत निकाल लावा असे सांगितले आहे. मात्र या निकालाला उशीर लावण्यासाठीच ते घानाला जात आहेत. ही आपल्या देशातील लोकशाहीची दारुण हत्या आहे. आधी महाराष्ट्रातील लोकशाहीचा निर्णय द्या आणि मग दुसरी कडे जा. जर तुम्हाला खात्री आहे. तुम्ही योग्य आहात तर तसा निर्णय द्या. निर्णय देत नाही आहात याचा अर्थ वेळ काढूपणा सुरु आहे.’ अशी टीका यावेळी राऊत यांनी नार्वेकरांवर केली आहे.

दगडूशेठने शब्द पाळला मात्र, अन्य मंडळांमुळे पुण्यातील विसर्जन मिरणूक रेंगाळली

तसेच यावेळी राऊत यांनी मुंबईतील मुलुंड या भागामध्ये एका मराठी महिलेला व्यावसायासाठी लागणारी जागा नाकारल्याच्या प्रकारावरून भाजप आणि एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्यांची ताकद कमी व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.’ अशा शब्दांत राऊतांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube