Myanmar Earthquake death Toll surging: विनाशकारी भूकंपामुळे (Earthquake) म्यानमार (Myanmar) थायलंड या राष्ट्रांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. म्यानमारमध्ये तर मृत्यूचा तांडव दिसून येत आहे. या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये 1 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. परंतु कोसळलेल्या इमारतींचा विध्वंस पाहता हा आकडा दहा हजारापर्यंत जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. कोसळलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु सातत्याने येत असलेल्या भूकंपामुळेही बचाव कार्यात अडथळे येत आहेत. गेल्या दोन दिवसांत 16 वेळा भूकंपाचे झटके बसलेत.
Death toll is estimated to be over 1,000, but due to internet blackout imposed by Junta exact number remains unknown.
Pray for Myanmar 🇲🇲 ❤️ 🙏
Please be safe everyone ❤️ #WhatsHappeningInMyanmar#Myanmar #earthquake #แผ่นดินไหว #ตึกถล่ม pic.twitter.com/FGxIhm9Rnp
— Sumit (@SumitHansd) March 29, 2025
यूरेशियन आणि इंडो-ऑस्ट्रेलिया भूखंडाच्या प्लेटा एकमेंकाना धडकत आहेत. त्यामुळे म्यानमारला मोठ्या भूकंपाचे धोके आहेत. 1990 ते 2019 मध्ये म्यानमार देशात 140 हून अधिक छोटे-मोठे भूकंप झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या भूकंपामुळे म्यानमारला लागून असलेल्या लांब समुद्रा किनाऱ्यामुळे त्सुनामीचा धोका आहे. सागाइंग, फॉल्ट सागाइंग, मंडाले, बागो आणि यांगून हे शहरी भागांना भूकंपाचे धोके आहेत. या भागात म्यानमारची 46 टक्के लोकसंख्या आहेत.
Earthquake नंतर तैवान आगीतून फुफाट्यात; 30 लढावू विमानं पाठवत चीनची घुसखोरी
संकटकाळात भारत मदतीला
काही महिन्यांपूर्वी म्यानमार आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु संकटाच्या काळात भारत म्यानमारसाठी धावून आला आहे. म्यानमारमधील बचाव कार्यासाठी भारत ऑपरेशन ब्रह्मा राबवत आहे. या ऑपरेशनमध्ये 15 टन साहित्य, एनडीआरएफची 80 जणांची एक टीम आणि फील्ड हॉस्टिपल मदतीसाठी पाठविले आहे. फील्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व नर्सेस असे 118 जण असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा म्यानमारचा मित्र आहे. त्यामुळे कठिण परिस्थिती आम्ही या देशाबरोबर आहोत. त्यांना आवश्यक सर्व मदत केली जाईल.
म्यानमारमध्ये मानवी संकट
म्यानमार हा देश भूकंपापूर्वी अनेक संकटांशी सामना करत आहेत. या देशात गृहयुद्ध झाले आहे. भूखमारी आहे. आरोग्याची सुविधा नाहीत. त्यामुळे भूकंपासारख्या आपत्तीचा सामना हा देश करू शकत नाहीत. त्यामुळे जगभरातून म्यानमारला औषधे, खाद्यपदार्थ पाठविले जात आहे. भूकंपानंतर येथील सार्वजनिक व्यवस्था बिघडलेली आहे. त्यामुळे बचाव कार्यतही अडचणी येत आहेत.