Download App

देवा तुझी एकही चूक… प्रिया मराठेला जाऊन महिना उलटला, शंतनू मोघेची भावूक पोस्ट…

Shantanu Moghe ने प्रिया मराठेला जाऊन महिना झाला असताना भावूक पोस्ट केली. ज्यात त्याने प्रियाची काळजी घेण्यासाठी देवाला देखील सुनावले आहे.

Shantanu Moghes Emotional FB Post after a month of Priya Marathe death : 31 ऑगस्ट रोजी मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरशी झुंज देताना निधन झालं तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा आणि अभिनेता शंतनू मोघे (Shantanu Moghes FB Post) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यावर त्याने प्रिया मराठेला जाऊन महिना झाला असताना एक भावूक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांने प्रियाची काळजी घेण्यासाठी देवाला देखील सुनावले आहे.

शंतनू मोघेची (Shantanu Moghe) भावूक पोस्ट

या पोस्टमध्ये शंतनूने (Shantanu Moghes  FB Post) आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यामध्ये तो म्हणाला की, ही खास कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली पोस्ट आहे. ज्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमांतून आम्हाला या दु:खातून सावरण्यासाठी धीर दिला. त्या सर्वांचे आभार. या प्रेमाने काळजीने आमचा मानवतेवरील विश्वास पुन्हा जागा झाला.

अनेकदा संघाला चिरडण्याचे प्रयत्न पण…, आरएसएस शताब्दी समारंभात PM मोदी स्पष्टच म्हणाले

प्रियाला जाऊन आज एक महिना उलटला. हे दु: शब्दांत व्यक्त करत येत नाही. तिच्या अकाली जाण्याने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहेत. पण तिने असंख्य लोकांच्या ह्रदयाला तिच्या अभिनयातून, प्रेमळपणातून स्पर्श केला आहे. त्याचच प्रतिबिंब हे तिच्या निधनानंतर आम्हाला आलेल्या फोन आणि मेसेजमध्ये दिसून आलं.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=24718196004476691&id=100001389021532&rdid=4Ng7XhtsOai4rYqX#

टिळा-टिकली लावू नका, अन्यथा.. कल्याणच्या केसी गांधी शाळेचा अजब फतवा, पालक आक्रमक

त्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा आभार. देवांनो, तिची काळजी घेण्यामध्ये, तिच्यावर प्रेम करण्यामध्ये केली गेलेली तुमची एकही चूक माफ केली जाणार नाही. माझी देवदूत जोपर्यंत आपण पुन्हा भेटू तो पर्यंत असं म्हणत या पोस्टच्या (Shantanu Moghes  FB Post) शेवटी त्याने इमोजीतून प्रियाबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

Shantanu Moghes FB Post : कॅन्सरशी झुंज हरली!

दूरदर्शन, चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचे (31 ऑगस्ट) सकाळी निधन झाले. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा (Famous Actress) देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, या आजाराशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उपचार सुरू असतानाच आज (Entertainment News) त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, या आजाराशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

follow us