India VS West Indies India beat West Indies by an innings and 140 runs in the first Test : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यामध्ये भारताने वेस्ट इंडीजला पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि 140 रन्सने पराभूत केले.
Video : ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला; उद्धव ठाकरेंनी फुंकलं पालिका निवडणुकीचं रणशिंग
यावेळी झालेल्या या सामन्यामध्ये टॉस जिंकून वेस्ट इंडिजने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने दोन सेशनमध्येच 162 वर आऊट केले. यामध्ये मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. तर टीम इंडीयाने दुसऱ्या डावामध्ये 5 विकेट गमावून 448 धावा करत डाव घोषित केला. त्यामुळे 286 रन्सची आघाडी घेतली. त्यात केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाने नाबाद राहत शतक ठोकले. तर कॅप्टन शुभमन गिलने अर्धशतक केले.
दुसरीकडे भारत विरूद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्याअगोदरच भारताने डाव घोषित केला होता. तेव्हाच त्यांचा ध्येय स्पष्ट झालं होतं की, सामना चौथ्या दिवशीपर्यंत खेळला जाऊ द्यायचा नाही. गोलंदाजांनी हे करून दाखवलं त्यामुळे पु्न्हा एकदा भारताने वेस्ट इंडिजला दोन सेशनच्या आत 146 रन्सवर गुंडाळत डाव आणि 140 रन्सने सामना आपल्या नावावर केला. तर जडेजाने 4 तर सिराजला तीनदा यश मिळालं.