Violence erupted again in Bangladesh! 52 people died in the conflict : आपला शेजारचा राष्ट्र बांगलादेशमध्ये आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता टोकाला गेलाय. बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाकामध्ये पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आंदोलन (Bangladesh Protest) सुरू आहे. त्यातून रविवारी दुपारी सत्ताधारी अवामी लीगचे समर्थक आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसा भडकली. त्यात 72 जणांचा मृत्यू झालाय.त्यात चौदा पोलिसांचा समावेश आहे. तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झालेत.
खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग वाढला, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर तैनात
Bangladesh protesters return to the streets to demand PM’s removal — in pictures.
🔗: https://t.co/UWg29j3ZQu pic.twitter.com/IGt6CeuZMp
— Al Jazeera English (@AJEnglish) August 4, 2024
अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांना तीव्र विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार संघर्ष झालाय. ढाका शहरात दहा हजारांहून अधिक जणांचे आंदोलन सुरू होते. दोन्ही गटात संघर्ष सुरू झाल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा आणि ग्रेनेंडचा वापर केला. त्यानंतर सरकारने रविवारी सायंकाळी सहा वाजता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट बंद करण्यात आले आहेत. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतीय विद्यार्थीही मायदेशी परतले आहे. पण त्या देशात असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचनाही भारताच्या विदेश मंत्रालयाकडून देण्यात आल्यात.
बांगलादेशातील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर…; CM ममता बॅनर्जींचं मोठं विधान
विरोधकांची असहकार चळवळ !
सत्ताधारी पक्षाविरोधात मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने असहकार चळवळ पुकारली आहे. त्यात नागरिकांनी कर भरू नयेत, रविवारी कामावर येऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये रविवार हा कामकाजाचा दिवस असतो. त्यामुळे रविवारी शेख मुजिब वैद्यकीय विद्यापीठ, सार्वजनिक रुग्णालये सुरू होते. येथे आंदोलनकर्त्यांनी हल्ले केलेत. तसेच क्रूड बॉम्बही फेकले असून, वाहनेही जाळून टाकली आहेत.
तोडफोड करणारे दहशतवादी
पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यात आग ओकणारे विधान केले आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्ती विद्यार्थी नसून ते दहशतवादी आहेत. अशा दहशतवादी व्यक्तींविरोधात कडक कारवाई केली पाहिजे. देशातील लोकांनी या व्यक्तींविरोधात लढावे, असे आवाहन शेख हसीना यांनी केले आहे. तसेच लष्करी दल आणि पोलिस प्रमुखांची शेख हसीना यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत.
बांगलादेश का पेटला ?
गेल्या महिन्यात हिंसेमध्ये दोनशेहून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालाय. आरक्षणाची कोटा प्रणाली रद्द करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामध्ये लढणारे व्यक्तीच्या वारसांना, त्यांचे नातेवाईक आणि तेव्हा लढलेल्या सैन्य व इतर अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ते आरक्षण रद्द करण्यासाठी काही विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.