Gautam Adani : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे गौतम अदानीच्या (Gautam Adani) पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, गौतम अदानी ग्रुपची (Gautam Adani Group) बांगलादेशात चौकशी होणार आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या काळात झालेल्या डीलची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात अदानी ग्रुपने बांगलादेशात विविध व्यावसायिक ग्रुपसोबत ऊर्जा करार केले होते. आता बांगलादेश सरकारकडे ऊर्जा करारांची चौकशी करण्यासाठी एजन्सी नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. या करारांबाबत चौकशीसाठी काही दिवसांपूर्वी बांगलादेश सरकारने पुनरावलोकन समिती स्थापन केली होती, ज्याने आता ही शिफारस केली आहे.
7 प्रकल्पांचा आढावा घेणारी समिती
ऊर्जा, एनर्जी आणि खाण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुनरावलोकन समितीने 2009 ते 2024 पर्यंत शेख हसीना यांच्या काळात स्वाक्षरी केलेल्या मोठ्या वीज निर्मिती करारांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक कायदेशीर आणि तपास यंत्रणा नियुक्त करण्याची शिफारस केली आहे.
तर दुसरीकडे सरकारच्या मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, समिती सध्या सात मोठ्या ऊर्जा आणि एनर्जी प्रकल्पांचा आढावा घेत आहे. यामध्ये अदानी BIFPCL च्या 1,234.4 MW क्षमतेच्या कोळसा-आधारित प्रकल्पाचा समावेश आहे.
BIFPCL ही अदानी पॉवर लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कंपनीने एका चिनी कंपनीसोबत देखील करार केला आहे, ज्याने 1,320 मेगावॅटचा कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्प बांधला आहे. उर्वरित सहा करार बांगलादेशी उद्योग ग्रुपसोबत करण्यात आले आहेत, जे मागील सरकारच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते.
पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना $265 दशलक्ष (सुमारे 2,200 कोटी) लाच देण्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या वकिलांनी केला होता. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतर सात जणांवर महागडी सौरऊर्जा खरेदी करण्यासाठी आंध्र प्रदेश, ओडिशाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे.