Gautam Adani : अदानी ग्रुपला मोठा फटका, टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Gautam Adani : अदानी ग्रुपला मोठा फटका, टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

मुंबई : अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग (Hindenburg Research)यांच्या अहवालानंतर अदानी (Adani Group) समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग अब्जाधीश (Bloomberg billionaire)निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) यांची चौथ्या क्रमांकावरुन 11 व्या क्रमांकावर घसरण झालीय.

अदानी ग्रुपला तीन दिवसांमध्ये 65 अब्ज डॉलर (सुमारे 5.3 लाख कोटी रुपये) चं नुकसान झालंय. गत आठवड्यात बुधवारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गनं अदानी समूहावर गंभीर आरोप केले. त्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांत मोठी घसरण (Big fall) झालीय.

अदानींच्या काही कंपन्यांचे शेअर्स सोमवारी देखील घसरले. त्यामुळं अदानी समुहाच्या कंपन्यांची मार्केट कॅप 5.3 लाख कोटी रुपयांनी कमी झाली. शेअर्सच्या घसरणीमुळं कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानींच्या संपत्तीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. अर्थात त्यामुळं तीन दिवसांत अदानींची संपत्ती सुमारे 37 अब्ज डॉलर (30,20,51,35,00,000 रुपये) इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालीय.

फोर्ब्सच्या माहितीनुसार, अदानींच्या संपत्तीमध्ये सोमवारी 8.3 अब्ज डॉलरची घट झालीय. अदानी ग्रुपच्या दहापैकी सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी घसरण सुरुच होती. सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये झाली.

या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटला आल्याचे पाहायला मिळाले. अदानी पॉवर (Adani Power), अदानी विल्मर (Adani Wilmer)आणि एनडीटीव्ही (NDTV)5 टक्के आणि अदानी पोर्ट्स 1.11 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्येही 18.11 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. अदानी ग्रुपची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेस 3.36 टक्के, एसीसी 0.48 टक्के आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स 2.15 टक्के वधारल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube