Download App

Cyber Crime : कार्टून स्वरूपात ग्राहकांसाठी RBI ने आणलं ‘Raju & 40 Thieves’ बुकलेट

गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांकडूनन विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.

  • Written By: Last Updated:

Raju & 40 Thieves : गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांकडूनन विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. या सर्व घटनापासून नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक खास बुकलेट जारी करण्यात आले आहे. यात सायबर फसवणुकीपासून कसा बचाव करता येईल याबाबत गोष्टींच्या माध्यमातून महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. (RBI Raju and the forty thieves to save from cyber fraud)

कार्टूनच्या माध्यमातून जागरूरकता

तुम्ही अली बाबा आणि चाळीस चोरांची कथा वाचली असेल, जे गूढ गुहेत लूट आणि चोरीचा माल लपवायचे. आजचे चोर हे त्या कथेच्या अगदी उलट आहेत. त्यांच्या जागेवर बसून ते तुम्हाला कधी लिंक पाठवून तर कधी ओटीपी मागून तुमचे खाते रिकामे करतात. अशा गैरकृत्यांपासून तुम्हाला सावध करण्यासाठी, आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) च्या बँकिंग लोकपालने कॉमिक्ससारखी एक पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये राजू आणि चाळीस चोर या काल्पनिक पात्राच्या कथेतून हे दाखवण्यात आले आहे की गुन्हेगार कसे 40 मार्गांनी तुमचे बँक खाते रिकामे करतात.

‘बी अवेअर’ पासून सुरूवात

ग्राहक जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी जुलैमध्ये आरपीआयकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ‘बी अवेअर’ पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. त्याचा विस्तारित भाग आता Raju And 40 Thieves या शीर्षकाने जारी करण्यात आला आहे. प्रकाशित बुकलेटमध्ये आरबीआयकडून डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या मालिकेत कार्टूनच्या माध्यामातून 40 कथांद्वारे नागरिकांना जागरूक करण्यात आले असून, यातील राजू नावाचे पात्र ग्राहक म्हणून दाखवण्यात आले आहे. यापूर्वी, एटीएम कार्ड क्लोनिंग करून, एटीएममध्ये चिप बसवून किंवा बूथमध्ये कॅमेरे बसवून फसवणूक केली जात होती. मात्र, आता आरबीआयने जारी केलेल्या पुस्तिकेत फिशिंग लिंक्स, विशिंग कॉल्स, ऑनलाइन मार्केट प्लेसचा वापर, क्रेडिट कार्ड वार्षिक फीमध्ये सवलत, एटीएम कार्ड स्किमिंग फसवणूक, सिम स्वाइप, सिम क्लोनिंग, क्रेडिट लिमिट, सर्च इंजिन, क्यूआर कोड स्कॅनिंग विविध फसवणुकींच्या पद्धतींचे विश्लेषण करण्यात आले आहे.

RBI चं खास बुकलेट वाचण्यासाठी येथे क्लिक करा – RB ‘Raju & 40 Thieves’

follow us