Delhi AQI : राजधानी दिल्लीपासून (Delhi AQI) ते हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश याशिवाय देशातील बहुतांश भाग हे आजकाल धूक आणि वायू प्रदूषणाच्या आव्हानांना तोंड देत आहेत. वायु प्रदूषणामुळे देशातील अनेक महत्वाच्या आणि मोठ्या शहरात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. त्यातच दिवाळीतील फटाक्यांमुळेसुध्दा हवेतील ऑक्सिजनची पातळी घसरली आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडल्यानंतर श्वास घेणं सुद्धा कठीण होतं तर डोळ्यांची जळजळ अशा अनेक समस्या उद्भवत आहेत.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच थांबणार, कारणे आहे तरी काय ?
वाढत्या वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालवल्याने याचे आपल्या शरीरावर अनेक प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. म्हणजेच दीर्घ काळापर्यंत शासनाचे विकार, हृदयविकार आणि अगदी मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचेही आरोग्यतज्ञ सांगतात. त्यामुळे आता इनडोर आणि आउटडोर वायु प्रदूषणापासून स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे? याबद्दलच जाणून घ्या.
17 नोव्हेंबरला दिल्ली एनसीआरच्या बहुतांश भागात हवेचा दर्जा निर्देशांक 400 आणि त्याहून अधिक मांडला गेला आहे. हवेच्या गुणवत्तेच्या सीवियर कॅटेगिरी म्हणजे गंभीर श्रेणीत आला आहे. त्यामुळे आपल्या जीवन शैली काही बदल करणं गरजेचं असल्याचं आव्हान डॉक्टरांकडून करण्यात येते जेणेकरून हवेचे दुष्परिणाम कमी करता येतील.
आऊटडोअर प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल –
– घराबाहेर पडताना प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांना फिल्टर करण्यासाठी डिझाईन केलेले मास्क वापरा, यासाठी N95 हे जास्त उपयुक्त तर ठरू शकतात.
– साध्या कपड्यांपासून बनवलेले मास्क सुद्धा वापरता येऊ शकतात.
– महत्त्वाचं म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर न जाता घरीच सराव करणं कधीही चांगले.
– श्वसन मार्गसोबतच प्रदूषित हवेपासून डोळ्याच्या आरोग्याचे रक्षण करणे सुद्धा तितकच महत्त्वाचे आहे. त्यासाठी बाहेर पडताना नियमित चष्मा चा वापर करा.
इनडोअर प्रदूषणापासून कसा बचाव करावा –
– काही अभ्यासातून असं दिसून आला आहे की घरातील प्रदूषण हे बाहेरील प्रदूषणा इतकंच आरोग्यासाठी हानिकारक आहे.
– हे टाळण्यासाठी आणि घरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर केला जाऊ शकतो.
– तुम्हाला दम्यासारख्या आजारांचा त्रास असेल तर हे जास्त फायदेशीर ठरते
– घरात आणि खोलीमध्ये वेंटीलेशन असणे अत्यंत गरजेचे आहे.
अशाप्रकारे तुम्ही घरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि घरातील हवा खेळती राहणयासाठी हे उपाय वापरू शकता.
प्रदूषणाच्या धोक्यापासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. एकूणच श्वसन आरोग्य आणि फुफ्फुसांचं कार्य वाढवण्यासाठी योग-व्यायामातून तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. यासोबतच अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनने समृद्ध असलेल्या आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून तुम्ही तुमचं आरोग्य राखू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रदूषित वातावरणात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे सुद्धा तितकच आवश्यक आहे. त्यामुळे दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याचे उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवले पाहिजे.