Download App

Israel Hamas War : गाझा पट्टीतील युध्द थांबवण्याची मागणी करणारा प्रस्ताव UN मध्ये मंजूर, अमेरिका मतदानासाठी गैरहजर

  • Written By: Last Updated:

वॉशिंग्टन : गेल्या महिन्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील (Israel Hamas War) सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत 9,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी तर इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा (Al Shifa Hospital) ताबा घेतला. अशातच आता अमेरिकेने इस्रायलला मोठा धक्का दिला आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 15 सदस्यीय परिषदेत हा प्रस्ताव 12-0 अशा फरकाने मंजूर झाला आहे. तर आत्तापर्यंत हमासच्या विरोधात इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) मतदान केले नाही.

बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाला अनिसचा विरोध, जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी 

गाझामधील संघर्षात आतापर्यंत 11,240 लोक मारले गेले आहेत. ज्यामध्ये 4,630 मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझाच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक बेघर झाले आहेत. इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडील अर्धा भाग पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिले. अशातच आज गाझामध्ये सुरू असलेल्या युध्दात त्वरित मानवीय रोक आणि कॉरिडॉरचे आवाहन या प्रस्तावात करण्यात आले आहे. या युद्धावर संयुक्त राष्ट्रांमध्ये संमत झालेला हा पहिला ठराव आहे. तसे, रशियासंदर्भातील अनेक प्रस्ताव UN मध्येही आणले गेले. तथापि, युक्रेन युद्धावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. हा प्रस्ताव माल्टाने आणला होता. यावरील मतदानावेळी अमेरिका, रशिया आणि ब्रिटन गैरहजर राहिले. यामुळे माल्टाला इतर देशांना एकत्र आले आणि इस्रायलच्या विरोधात मतदान करता आले.

लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले 

आम्ही जे साध्य केले ते एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि सशस्त्र संघर्षांमधील मुलांच्या दुर्दशेसाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेवर ठाम राहू, असं माल्टाच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत व्हेनेसा फ्रेझियर म्हणाल्या.

मात्र, हा प्रस्तावही वादग्रस्त आहे. यामध्ये मागणी करण्याऐवजी आवाहन करण्यात आले. यामुळे हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली आणि परदेशी ओलिसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याच्या मुद्द्याचे गांभीर्य संपले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याचाही यात उल्लेख नाही. चूक लक्षात आल्यानंतर रशियाचे राजदूत वसिली नेबेन्झिया यांनी मतदानापूर्वी प्रस्ताव दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.

इस्रायलने गाझातील सर्वात मोठ्या रुग्णालयाचा ताबा घेतला
इस्त्रायली सैन्याने बुधवारी गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा ताब्यात घेतले. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडली आहेत. यापूर्वी रुग्णालयात अनेक ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अजूनही अनेक रुग्णालयांमध्ये दहशतवादी असू शकतात.

Tags

follow us

वेब स्टोरीज