बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाला अनिसचा विरोध, जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) महाराज यांचा दरबार आणि हनुमान कथा सत्संग कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातही भरवल्या जाणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी हा बागेश्वर धाम महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरात यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेत असणार आहे. मात्र, आता या कार्यक्रमाला आता अंनिसने (Maharashtra Superstition Eradication Committee) विरोध दर्शवला आहे.
लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले
पुण्यातील अनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी माध्ममांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम पुण्यात होतोय. त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी अपशब्द वापरले. त्यांचा दरबार, सत्संग पुण्यात होऊ नये, यासाठी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनिसच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. ते जादूटोना करतात. त्यामुळं त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी, ही अनिसची मागणी असल्याचं देशमुख म्हणाले.
‘आता भुजबळांचं वय झालं, भान ठेऊन…’, भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर
या कार्यक्रमाचे आयोजक जगदीश मुळीक म्हणाले की, पुणे शहरात बागेश्वर धाम महाराजांचा कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ते या कार्यक्रमात हनुमान कथा सांगणार आहेत. याशिवाय बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबारही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी भव्य पार्किंगही करण्यात आले. दोन लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. तरी पुणेकरांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा, असं मुळीक म्हणाले.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही धीरेंद्र शास्त्रींच्या या कार्यक्रमाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सुदर्शन जगदाळे यांनी पुण्यातील बागेश्वर धाम सरकारच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. जगदाळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर धीरेंद्र शास्त्री यांचा एक प्लेक्स पोस्ट टाकून संत तुकारामांच्या भूमीत खोट्या बाबांना थारा नाही, असे लिहिले आहे. विशेष म्हणजे अजित पवार महायुतीला पाठिंबा देऊन सत्तेत आले. अशातच अजितदादा गटाकडून भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध सुरू झाल्यानं चर्चांना उधाण आलं.