Difference Between Log in and Sign in : इंटरनेट आणि मोबाईल अॅप्सच्या जगात आपण दररोज लॉग इन आणि साइन इन सारखे शब्द वापरतो. परंतु कधीकधी लोकांना वाटते की ते एकच आहेत, परंतु, या दोन्ही टेक्निकल शब्दांत नेमका फरक काय? त्यांचा अर्थ काय आणि कोणता शब्द कधी वापरले जातात त्याबद्दल जाणून घेऊया.
मोठा दिलासा! दुप्पट टोलची कटकट संपली; FASTag नसलेले वाहनचालक UPI पेमेंट करू शकणार
लॉगिन म्हणजे काय?
लॉगिन म्हणजे आधीच तयार केलेल्या खात्यात लॉग इन करणे होय. जेव्हा तुम्ही वेबसाइट किंवा अॅपवर वापरकर्ताचे नाव आणि पासवर्ड टाकता तेव्हा तुम्ही लॉग इन करता. ही प्रक्रिया तुम्ही आधीच तयार केलेल्या खात्यात प्रवेश करण्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ, जीमेल किंवा फेसबुकमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकणे याला लॉग इन म्हणतात.
साइन इन म्हणजे काय?
साइन इनचा वापर अकाउंट अॅक्सेस करण्यासाठी देखील केला जातो, म्हणजेच, जर तुम्ही फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार केले तर, तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाते. हा अधिक यूजर फ्रेंडली शब्द आहे. टेक कंपन्या यूजर्सना एक सोपा अनुभव देण्यासाठी साइन इन शब्द वापरतात. दोन्ही शब्द जवळजवळ एक समान काम करतात, मात्र, फरक फक्त टर्मिनोलॉजीत आहे. उदाहरणार्थ, गुगल किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला साइन इन दिसते.
WhatsApp ला पिछाडत नंबर 1 बनलं Arattai, जाणून घ्या ‘अरत्ताई’ शब्दाचा नेमका अर्थ!
लॉग इन आणि साइन इन मध्ये खूप फरक आहे का?
लॉग इन आणि साइन इन दोन्ही म्हणजे तुमचे खाते अॅक्सेस करणे असाच आहे. तथापि, साइन इन हे अधिक आधुनिक आणि यूजर फ्रेंडली मानले जाते, तर लॉग इन थोडे अधिक टेक्निकल आणि पारंपारिक शब्द आहे. म्हणूनच नवीन वेबसाइट आणि अॅप्स बहुतेकदा साइन इनला प्राधान्य देतात.
लॉग इन, साइन इन आणि साइन अप मध्ये काय फरक?
लॉगिन आणि साइन इन व्यतिरिक्त, साइन अप हा शब्द देखील खूप वापरला जातो. हे तीन शब्द ऑनलाइन जगात सर्वात जास्त वापरले जातात, परंतु त्यांचे अर्थ वेगळे आहेत. साइन अप म्हणजे नवीन खाते तयार करणे, म्हणजेच पहिल्यांदाच वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करणे असा आहे.
तर, साइन इन आणि लॉग इन म्हणजे एकच गोष्ट आहे, जी यूजरला नाव आणि पासवर्ड प्रविष्ट करून आधीच तयार केलेल्या खात्यात लॉग इन करण्याची परवानगी देतो. सोप्या शब्दांत, साइन अप म्हणजे नवीन खाते तयार करणे आणि साइन इन/लॉग इन म्हणजे आधीच तयार केलेल्या खात्यात प्रवेश करणे होय.