Download App

महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत.

Government Schemes : गरिबी निर्मुलनासाठी (Poverty alleviation)जपानचा निधी (JFPR) सहाय्यित राज्यातील लहान फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांंना (Farmer)शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.

पूजा खेडकरची आधी नाव आता वयातही अफरातफर; तीन वर्षांत एक वर्षांने वाढलं वय

योजनेच्या प्रमुख अटी :
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत. या साखळ्यांतील 14 ठिकाणी फळे व भाजीपाला उत्पादकांच्या एकूण 18 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या असून फक्त 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येतो.

मोठी बातमी! पूजा खेडकरांना ट्रेनिंग होल्ड करण्याचे आदेश

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : आशियाई विकास बॅंकेच्या मान्यतेने वेळोवेळी निश्चित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचीनुसार कागदपत्रे सादर करावी.

लाभाचे स्वरूप असे :
• काढणी पश्चात हाताळणी, मुल्यवृध्दी, विक्री व्यवस्थापन इ.चे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रशिक्षण.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रक्षेत्र भेटी.
• शेतकरी-खरेदीदार थेट संबंध स्थापित करण्यासाठी विशेष परिसंवाद.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी “फिरता निधी”.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणा-या प्राथमिक प्रक्रीया सुविधांसाठी अर्थसहाय्य.

या ठिकाणी संपर्क साधा :
प्रकल्प संचालक, निधी व्यवस्थापन कक्ष,
जेएफपीआर प्रकल्प,F/E/78, LDB बिल्डींग, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-37.
दुरध्वनी क्र.-020-2426 0574/5. ई-मेल – giujfpr@msamb.com.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us