Download App

Pune Railway Station : पुण्यातून रेल्वेने प्रवास करताय? 100 दिवस सहन करावा लागणार त्रास

Pune Railway Station will close for daily 4 hours : दळणवळणाचे महत्त्वाचं माध्यमं म्हणजे रेल्वे मात्र पुणेकरांसाठी याच रेल्वेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता दररोज चार तास पुणे रेल्वे स्टेशन बंद असणार आहे. स्टेशनच्या फलाटाच्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Marathi Movie: मराठीला चित्रपटाला येणार सुगीचे दिवस; सरकारचा मोठा निर्णय 

हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे हे काम जलद गतीने करण्यासाठी आता दररोज चार तास पुणे रेल्वे स्टेशन बंद असणार आहे. त्यामुळे यावेळेमध्ये एकही रेल्वे स्टेशनवरून ये जा करू शकणार नाही तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे.

Gutami Patil च्या कार्यक्रमात राड्याचं सत्र थांबेना, डान्स शो दरम्यान पत्रकारांवर हल्ला

या स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंगचे म्हणजेच फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे रेल्वेच्या बांधकाम विभागाने तात्काळ हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या स्टेशनवरून 155 गाड्या धावतात. त्यापैकी 65 गाड्या पुणे विभागातून सुटतात. यातून दिवसाला साधरण एक लाख 20 हजार प्रवासी प्रवास करतात. काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ‘रिमॉडेलिंग’चे काम सुरू झाल्यानंतर साडेतीन महिने प्रवाशांना मोठा त्रास सहन कारावा लागणार आहे.

Tags

follow us