Download App

हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ, जातीय दंगली झाल्या तर तेच जबाबदार…; जरांगेंचे टीकास्त्र

मी कशात नाही म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघड पडलेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेचं आंदोलन उभं केलं होतं - मनोज जरांगे

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) संरक्षणार्थ केलेलं उपोषण लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) स्थगित केलं. आज एक सरकारी शिष्टमंडळ त्यांना भेटीसाठी गेलं होतं. यामध्ये छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. हे उपोषण स्थिगित झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली.

‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला 

जरांगे म्हणाले की, मी कशात नाही म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघड पडलेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेचं आंदोलन उभं केलं होतं, असा आरोप जरांगेंनी केला. ते म्हणाले, ओबीसी नेते म्हणतात कुणबींच्या ज्या नोंदी झाल्या, त्या खोट्या आहे. कुणबी असल्याचे पुरावे खोटे आहेत. मात्र, मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक दाखले आहेत. मात्र, सरकारचं मराठ्यांवर अन्याय करतंय. आम्ही आधीच ओबीसीमध्ये आहोत, आम्ही कुणाचं काढून घेत नाही. उलट तेच आमच्या आरक्षणात आहेत. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्यात. अशा लाखो कुणबी नोंदी सरकारने दाबून ठेवल्या, असं जरांगे म्हणाले.

नीट परीक्षांच्या गोंधळात शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा; माजी इस्त्रो प्रमुखांवर दिली मोठी जबाबदारी 

सत्तेच्या पदावर बसलेल्या भुजबळ खोटे आंदोलन उभी करून मराठा आणि आोबीसीत भांडणं लावत आहेत. भुजबळ मराठा आणि धनगर समजात दंगल घडवतील. तुम्ही त्याच्या नादी लागू नका.

ते म्हणाले, सरकार आणि ओबीसी नेत्यांनी मराठ्यांची वाट लावायची ठरवली असेल तर आमचा नाईलाज आहे. होणारे परिणाम भोगायला तयार राहा.राज्यात जर जातीय दंगली झाल्या तर त्याला भुजबळच जबाबदार असतील, असा आरोप करत मराठ्यांना त्रास दे, मग सांगतो तुला असा इशाराही जरांगेंनी दिला.

ओबीसी आंदोलन संविधानाला धरून आहे, असं काही लोक फेसबुकवर लिहितात. पण, मराठ्यांचा प्रश्न त्यांना दिसत नाही का, असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला.

 

follow us