Download App

एनपीएस वात्सल्य योजना आहे तरी काय? मुलांच्या भविष्याची काळजीच मिटेल; जाणून घ्या, सर्वकाही..

मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.

NPS Vatsalya Scheme : आता मुलांच्या पिगी बँकेत पैसे साठवून ठेवण्याची गरज नाही. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. सरकारने नुकतीच लॉन्च केलेली एनपीएस वात्सल्य योजना तुमच्यासाठी (NPS Vatsalya Scheme) चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत पालक त्यांच्या मुलांच्या नावे पेन्शन खाते उघडू शकतात. या योजनेत कमाल आणि किमान किती पैसे गुंतवणूक करता येऊ शकते तसेच जमा केलेली रक्कम कधी काढता येऊ शकते याची माहिती घेऊ या..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही (Nirmala Sitharaman) दिवसांपूर्वी एनपीएस वात्सल्य योजना लॉन्च केली होती. या योजनेत पालक त्यांच्या कमी वयाच्या मुलांच्या नावे पेन्शन खाते उघडू शकतात. कारण दीर्घ काळात मुलांसाठी मोठी रक्कम तयार करू शकतात.

वात्सल्य योजना नेमकी काय आहे, या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते, योजनेत पात्र होण्यासाठी काय करावे लागेल, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती नाहीत का.. काही हरकत नाही आज आम्ही तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. वात्सल्य योजना दीर्घकालीन गुंतवणूक आणि पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलांचे भविष्य सुरक्षित करणे आणि मुलांसाठी पालकांमध्ये बचतीची सवय लावणे हा आहे. या योजनेत मुलांसाठी पालक रक्कम गुंतवू शकतात. या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड विनियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) मार्फत केले जाते.

या योजनेत कुणाला लाभ मिळणार

या योजनेत 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले पात्र आहेत. या मुलांचे आई वडील त्यांच्या नावे पेन्शन खाते उघडू शकतात.

Google देणार मोठा धक्का! बंद करणार लाखो Gmail अकाउंट; लगेच करा ‘हे’ काम

किती पैसे गुंतवणूक करू शकता

या योजनेत पैसे गुंतवणूक करण्यासाठी फ्लेक्सिबल पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच पालक वर्षाला कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीसाठी कोणतीही समय सीमा नाही. पालकांना वाटले तर ते कमी रकमेपासून सुरुवात करू शकतात आणि नंतर या रकमेत वाढ देखील करू शकतात. म्हणजेच तुम्ही जितके वाटेल तितके पैसे गुंतवणूक करू शकता.

एनपीएस वात्सल्य खाते कुठे सुरू करता येते

कोणत्याही जवळच्या बँकेत, पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन फंड सेवा देणाऱ्यांच्या माध्यमातून खाते उघडता येऊ शकते. तसेच एनपीएस पोर्टल (npstrust.org.in) वर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी खाते उघडू शकता.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता

मुलांचे जन्म प्रमाणपत्र किंवा स्कूल प्रमाणपत्र
आई वडिलांचे आधारकार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र
घराचा पत्ता म्हणून आधारकार्ड किंवा वीजबिल

पैसे कधी आणि किती काढता येतील

या योजनेत काही अटींसह तुम्ही मुलाचे 18 वर्षे पूर्ण होण्याआधी पैसे काढता येऊ शकतील.
योजनेत खाते सुरू केल्यानंतर तीन वर्षांनंतर एकूण जमा केलेल्या पैशांच्या 25 टक्के पैसे काढता येतील. मुलाचे वय 18 वर्षे होईपर्यंत तीन वेळा पैसे काढता येतील.
मुलांचे शिक्षण, औषधोपचार किंवा अपंगत्व आल्यासही खात्यातून 75 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे काढता येतील.
एकूण जमा रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर पूर्ण रक्कम काढता येऊ शकेल.

… तर OTP मुळे तुमचे बँक खाते रिकामे होणार, सरकारने दिला इशारा

मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एनपीएस वात्सल्य खाते रेग्यूलर एनपीएस खात्यात रुपांतरीत होईल. यानंतर मुलगा स्वतः या खात्यात पैसे गुंतवणूक करू शकेल.

योजनेचे फायदे

ही योजना मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून चांगली आहे.
पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.
या योजनेत गुंतवणूक केलेली रकमेतील एक हिस्सा इक्विटी आणि डेट फंड्समध्ये गुंतवणूक केला जातो. यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची संधी असते.
मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते नियमित एनपीएसमध्ये रुपांतरीत केले जाते.
योजनेंतर्गत जमा केलेले पैसे आयकर अधिनियमांतर्गत सवलतीस पात्र ठरू शकतात.
मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लॉक इन कालावधी असतो यानंतर काही प्रमाणात पैसे काढू शकता किंवा नियमित पेन्शनचाही पर्याय उपलब्ध करून दिला जातो.

follow us