Alert for Dengue and Malaria in India : देशात काही राज्यांत मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी एक एडवायजरी जारी केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर अलर्ट राहा अशा सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाला अशा सूचना देण्याची गरज का पडली? साथरोगाचं संकट तर येणार नाही ना? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील सर्व राज्यांना एक एडवायजरी जारी केली. आगामी काळात सतर्क राहा अशा सूचना दिल्या. डेंग्यू आणि मलेरियापासून संरक्षित राहण्यासाठी उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर जागरूकता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर हा आदेश जारी करण्यात आला.
डेंग्यू ते मलेरिया.. डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासून संरक्षणाचे घरगुती उपाय
राज्यात सध्या काय स्थिती आहे याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. 20 दिवसांत अॅक्शन प्लॅन तयार करावा. स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायतींनी लोकांमध्ये जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या अधीनस्त सरकारी दवाखान्यांत पुरेशी औषधे, तपासणी आणि उपचाराच्या सुविधा, खाटा आणि डासमुक्त वातावरण तयार करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.
राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि मलेरियाची स्थिती गंभीर आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांत देशात डेंग्यू,मलेरिया आणि चिकुनगुण्याचे रुग्ण वाढतात. तरीही आता देशाने मलेरियावर नियंत्रण मिळवले आहे. सन 2015 ते 2024 दरम्यान देशात मलेरियाची प्रकरणे 78 टक्क्यांनी कमी झाली.
इतकेच नाही मलेरियामुळे (Malaria in India) होणाऱ्या मृत्यूंतही इतकीच कमी आली आहे. 2022 ते 2024 दरम्यान देशातील 160 जिल्ह्यांत मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकापेक्षा कमी प्रकरणे आढळून आली. 2030 पर्यंत देशातून मलेरियाचा नायनाट करण्याचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केले आहे.
World Malaria Day : कसा फैलावतो मलेरिया, डेंग्यूपेक्षा किती वेगळा? काळजी घ्या अन् सेफ राहा