डेंग्यू ते मलेरिया… डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासून संरक्षणाचे घरगुती उपाय

Mosquitoes spread deadly diseases, know home remedies to protect yourself from mosquitoes on Worlds Mosquitoes Day : दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा करतात. हा दिवस ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये संशोधन करून सिद्ध केले की, मादी अॅनोफिलीस डासांमुळे माणसांमध्ये मलेरिया पसरतो. त्यांच्या संशोधनानंतरच जगाला मलेरिया आणि डासांमुळे होणाऱ्या इतर आजारांची गंभीरता लक्षात आली.
जागतिक डास दिन का साजरा केला जातो?
जागतिक डास दिन साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, डास हा केवळ एक लहान कीटक नाही, तर शेकडो प्राणघातक रोगांचा वाहक आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका विषाणू आणि पिवळा ताप यासारखे प्राणघातक आजार फक्त डासांमुळे पसरतात.
भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा
डासांमुळे पसरणारे प्रमुख आजार
मलेरियासारखा जीवघेणा आजार अॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. मलेरियाची लक्षणे म्हणजे जास्त ताप, थंडी वाजून येणे आणि अशक्तपणा. दुसरा जीवघेणा आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. त्यामुळे जास्त ताप, प्लेटलेट्सची कमतरता आणि शरीर दुखते. चिकनगुनिया हा आजार संक्रमित डासांच्या चाव्यामुळे पसरतो. या आजारामुळे होणारी सांधेदुखी बराच काळ टिकते. झिका विषाणू हा गर्भवती महिला आणि मुलांसाठी अधिक धोकादायक असतो. या आजाराचा वाहकसुद्धा डासच आहे. फायलेरियासिस नावाचा गंभीर आजारही डासांमुळेच होतो. हा आजार बराच काळ टिकतो व यात हाता-पायांना सूज येते.
Video : पालिका निवडणुकांपूर्वी शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंसह राष्ट्रवादीला पाडलं भगदाड
डास इतके धोकादायक का आहेत?
शास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्व कीटकांपैकी डास हे माणसांच्या मृत्यूला सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कीटक आहेत. एका अहवालानुसार, दरवर्षी लाखो लोक डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमुळे आपले प्राण गमावतात. डास इतके धोकादायक असण्याचं कारण थोड्याशा पाण्यातही डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. यामुळे त्यांना नियंत्रित करणे कठीण जाते. डासांमुळे होणाऱ्या काही आजारांवर लस उपलब्ध नाही (उदा. डेंग्यू, चिकुनगुनिया). त्यामुळे त्यांच्याविरूद्ध संरक्षण हेच मुख्य शस्त्र आहे.
डासांपासून कसे सुरक्षित राहावे?
पावसाळी आणि दमट हवामानात डासांची वेगाने पैदास होते. अशा परिस्थितीत, खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. डासांची पैदास होऊच नये यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. रात्री झोपताना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधकांचा वापर करा. पाण्याच्या टाक्या आणि भांडी झाकून ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. कडुलिंबाचे तेल, कापूर, सिट्रोनेला आणि लैव्हेंडर सारखे नैसर्गिक रिपेलेंट्सचा वापर करा.