World Malaria Day : कसा फैलावतो मलेरिया, डेंग्यूपेक्षा किती वेगळा? काळजी घ्या अन् सेफ राहा

आज जगभरात जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने विविध (World Malaria Day 2025) जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Malaria

World Malaria Day 2025 : आज जगभरात जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने विविध (World Malaria Day 2025) जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मलेरिया हा आजार काय आहे? आजार कशामुळे होतो याबाबत लोकांना माहिती देण्याचा उद्देश यामागे आहे. अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेला हा जुनाट आजार आजच्या दिवसांतही धोकादायक आहे. मलेरिया डास चावल्याने होत असला तरी डेंग्यू आणि मलेरिया यात फरक आहे.

मलेरिया हा जुनाट आजार आहे. भारतासह अनेक देशांत या आजाराचे रुग्ण आढळून येतात. डास चावल्याने मलेरिया होतो. पण या आजाराची सुरुवातीची लक्षणे लक्षात येत नाहीत. मलेरियाची काही लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. पण यात काही अंतर असते. मलेरिया हा आजार संक्रमित मादी एनोफिलिज या डासाच्या चावण्याने होतो.

मलेरियात सुरुवातीला थंडी वाजून येते तसेच तीव्र ताप येतो. हा ताप अचानकपणे खूप जास्त असू शकतो. मलेरियाच्या रुग्णांना डोकेदुखी आणि स्नायूंत वेदना जाणवतात. मलेरियात डेंग्यू प्रमाणे प्लेटलेट्स कमी होणे आणि शॉक सिंड्रोम यांसारखी स्थिती निर्माण होत नाही. यामुळे मलेरिया डेंग्यू इतका धोकादायक मानला जात नाही.

आश्चर्यच! डासांना पकडण्यासाठी बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस; ‘या’ आजाराने दक्षिण कोरिया हैराण

डेंग्यू आणि मलेरियात फरक काय

डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. हा आजार एडीस प्रजातीच्या डासाच्या चावण्याने होतो. डेंग्यूचे सर्वात सामान्य लक्षण ताप येणे हे आहे. पण यात रुग्णाला मलेरियासारखी थंडी वाजत नाही. डेंग्यूमध्ये डोकेदुखी आणि स्नायूंत वेदना जाणवू शकतात. डेंग्यूमध्ये ब्लिडिंग आणि त्वचेवर चट्टे दिसू शकतात.

या दोन्ही आजारात आणखी एक फरक आहे. मलेरिया प्लास्मोडियम परजीवीमुळे होतो. तर डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. या दोन्ही आजारांच्या उपचारातही अंतर आहे. डेंग्यूसाठी काही विशेष आजार नाही. लक्षणांच्या आधारावरच डॉक्टर उपचार करतात. मलेरियामध्ये अँटीमलेरियल औषधे रुग्णाला दिली जातात. डेंग्यूमध्ये काही रुग्णांच्या शरीरात अचानक प्लेटलेट्स कमी होतात. जर हा प्लेटलेट्स 30 हजारांपेक्षा कमी झाल्या तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

कसा कराल बचाव

डासांपासून बचाव करण्यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
डासांना अटकाव करण्यासाठी घरच्या आसपास कुठे पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.
घराची स्वच्छता ठेवा. घरात कचरा जमा होत राहणार नाही याची काळजी घ्या.
डेंग्यू किंवा मलेरियाची लक्षणे दिसू लागतात तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. दवाखान्यात जाऊन आवश्यक तपासणी करून घ्या.

सावधान! तुमच्या ‘या’ सवयींमुळे लिव्हरचे होतेय नुकसान; खास टिप्स फॉलो करा अन् राहा फिट..

follow us