सावधान! तुमच्या ‘या’ सवयींमुळे लिव्हरचे होतेय नुकसान; खास टिप्स फॉलो करा अन् राहा फिट..

सावधान! तुमच्या ‘या’ सवयींमुळे लिव्हरचे होतेय नुकसान; खास टिप्स फॉलो करा अन् राहा फिट..

World Liver Day 2025 : लिव्हर (यकृत) मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. मेटाबोलिजम ठीक राहणे, विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे, पाचन आणि अन्य शारीरिक हालचालींत लिव्हर महत्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक लिव्हर दिवस (World Liver Day 2025) आयोजित केला जातो.

शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाने कार्यरत राहणे आवश्यक आहे. पण आजच्या धकाधकीच्या काळात आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण (Fast Food) वाढले आहे. ताणतणाव तर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडत चालले आहे. अलीकडच्या काही वर्षांतील मेडिकल रिपोर्ट्सचा अभ्यास केला तर लक्षात येते की लिव्हर संबंधी आजारांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांतही लिव्हर संबंधी आजारांत मोठी वाढ झाली आहे.

लिव्हर मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. मेटाबोलिजम ठीक राहणे, विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे, पाचन आणि अन्य शारीरिक हालचालींत लिव्हर महत्वाची भूमिका बजावतात. लिव्हरच्या आरोग्यासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक लिव्हर दिवस आयोजित केला जातो.

आरोग्य तज्ञांच्या मते कमी वयापासून जर लिव्हरच्या आरोग्याकडे नीट लक्ष दिले गेले तर लिव्हर संबंधी आजारांपासून बचाव करता येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या काही सवयी लिव्हरला नुकसान पोहोचवत आहेत. या सवयी कोणत्या आहेत? यामुळे लिव्हरचे काय नुकसान होते? या सवयी दूर करण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेऊ या..

सिगारेट पिताय? मग सावध व्हा, ‘या’ 5 आजारांचा धोका; अकाली वृद्धत्वाचीही शक्यता

मद्यपान लिव्हरसाठी धोकादायक

अमेरिकन लिव्हर फाउंडेशननुसार जे लोक नियमितपणे दारू पितात अशा लोकांना फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि सिरॉसिस या आजारांचा धोका जास्त असतो. कमी प्रमाणात दारू पिण्याचे व्यसन देखील लिव्हरचे मोठे नुकसान करू शकते. तेव्हा शहाणे व्हा आणि जर दारू पित असाल तर आताच दारू सोडा. आरोग्य तज्ञांच्या मते लिव्हरचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर मद्यपान पूर्णपणे बंद केले पाहिजे. मद्यपान जर केलेच नाही तर लिव्हर संबंधी आजारांची शक्यता 40 टक्क्यांनी कमी होते.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

आपण रोज जे अन्न खातो त्याचा परिणाम आरोग्य आणि लिव्हरवर होतो. अनहेल्दी डाएट आणि जंक फूड खाण्याची (Junk Food) सवय लिव्हरसाठी अपायकारक ठरू शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिपोर्टनुसार हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, ट्रान्स फॅट आणि अतिप्रमाणात शुगर असलेले खाद्य पदार्थ नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसिजचे कारण बनतात.

त्यामुळे अगदी लहान वयातच जंक फूड आणि फास्ट फूड खाणे टाळा. लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार घेत राहा. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा.

शारीरिक निष्क्रियताही लिव्हरला त्रासदायक

आरोग्य तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्या व्यतिरिक्त तुम्ही फिजिकली किती कार्यरत राहता याचा थेट परिणाम तुमच्या लिव्हरवर पडत असतो. वर्ल्ड जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार शारीरिक निष्क्रियतेमुळे लिव्हर मध्ये फॅट जमा होत राहते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत राहते. जर तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त बसून काम करत असाल तर तुम्हाला लिव्हर संबंधी आजार होण्याचा जास्त धोका आहे.

Health Insurance : इमर्जन्सीमध्ये कसा कराल इन्शुरन्स क्लेम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप..

लिव्हरचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दिवसातून कमीत कमी अर्धा तास एक्सरसाइझ करणे खूप आवश्यक आहे. चालणे, योग करणे किंवा सायकल चालवणे यातील कोणताही व्यायाम तुम्ही दिवसातून किमान अर्धा तास करू शकता.

या गोष्टीही पक्क्या लक्षात ठेवाच

आरोग्य तज्ञांच्या मते आवश्यकतेपेक्षा जास्त आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचे सेवन करू नका. वेदनाशामक औषधांचा अतिवापर लिव्हर खराब करू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (World Health Organization) हिपॅटायटीस संक्रमणामुळे लिव्हरच्या अडचणी वाढतात. या अडचणी टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की लठ्ठपणा लिव्हरमध्ये सूज आणि फॅटी डिसिज वाढण्यात मदत करतो. यासाठी प्रत्येकाने शरीराचे वजन नियंत्रणात ठेवलेच पाहिजे.

टीप : वरील लेखातील माहिती फक्त सामान्य माहितीच्या आधारे दिली आहे. अमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube