Health Insurance : इमर्जन्सीमध्ये कसा कराल इन्शुरन्स क्लेम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप..

Health Insurance Claim : मानवी जीवनात संकट अचानक येते. कोरोना संकटाच्या काळात याची प्रचिती (Covid 19) अनेकांना आली. त्यामुळे इमर्जन्सी प्रसंगात नेहमी तयार रहावे लागते. यामुळे संकटाच्या काळात तुम्हाला पैशांची अडचण जाणवणार नाही. एक इमर्जन्सी तुमची वर्षानुवर्षांची सेव्हिंग क्षणात संपवू शकते. यासाठी लोकांकडून हेल्थ इन्शुरन्सला (Health Insurance) प्राधान्य दिले जाते. लोकांकडून आरोग्य विमा खरेदी केला जातो. यात जास्त अडचणी येत नाहीत. पण ज्यावेळी क्लेम करण्याची वेळ येते (Health Insurance Claim) तेव्हा बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसते. चला तर मग आज याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ या..
आपत्कालीन प्रसंगात कसा कराल क्लेम
जर कोणतीही आरोग्य इमर्जन्सी उद्भवली किंवा विमाधारकाला दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली तर अशा वेळी सर्वात आधी विमा कंपनीला माहिती द्यावी लागते. यानंतर क्लेम करावा लागतो. कंपनीने क्लेम मंजूर केल्यानंतर झालेला खर्च परत मिळतो. पण क्लेम नेमका कसा करावा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..
दवाखान्यात उपचारासाठी दाखल होताना सुरुवातीला काही पैसे तुम्हाला आधीच भरावे लागतात. तुम्ही तुमची केवायसी कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी कायम तयार ठेवा.
स्टेप 2 : याबरोबरच जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हेल्थ इन्शुरन्स कंपनी किंवा थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधून त्यांना माहिती द्या.
‘फक्त हसू नका…तर ढसा ढसा रडा’, हेल्दी राहण्यासाठी खूपच आवश्यक
स्टेप 3 : यानंतर हॉस्पिटलला लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स कार्ड आणि व्हॅलिड आयडी फोटो सबमिट करा.
स्टेप 4 : रुग्णालयाच्या मदतीने जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कंपनी किंवा टीपीएला pre-Authorisation Request पाठवून द्या. यात हॉस्पिटल आधीच बँकेला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज सांगेल.
स्टेप 5 : याबरोबरच सर्व हॉस्पिटल मधून सर्व कागदपत्रांची एक कॉपी तुमच्याजवळ ठेवा. कारण मूळ कागदपत्रे हॉस्पिटल क्लेम प्रोसेससाठी त्यांच्याकडेच ठेवून घेईल. जर तुम्ही पाठवलेली Pre Authorisation Request रिजेक्ट झाली तरीसुद्धा तुम्ही इन्शुरन्स क्लेम करू शकता. यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि बिल हेल्थ इन्शुरन्स कंपनी किंवा टीपीएकडे जमा करावी लागतील.
यानंतरही जर कंपनी किंवा टीपीए क्लेम नाकारत असेल तर अशा वेळी तुम्ही IRDAI ची वेबसाइट किंवा त्यांच्या ई मेल आयडीवर तक्रार पाठवू शकता. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क मध्ये नसलेल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही भरती झालेला असाल तरीसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता. यासाठी काय प्रक्रिया आहे याची माहिती घेऊ..
भारतीय UPI प्रणाली धोक्यात? मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा UPI क्रॅश…
स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला 15 ते 30 दिवसांत डिस्चार्ज मिळाल्यानंतर इन्शुरन कंपनीला माहिती द्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा की वेगवेगळ्या कंपन्यांचे नियम वेगवेगळे असू शकतात.
स्टेप 2 : यानंतर तुम्हाला एक क्लेम नंबर दिला जाईल. या नंबरचा उपयोग तुम्ही भविष्यात देखील करू शकता.
स्टेप 3 : यानंतर सर्व कागदपत्रे आणि मेडिकल खर्चाचे बिल इन्शुरन्स कंपनी किंवा टीपीएला सादर करा. जर कंपनीला आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल तर कंपनी तुमच्याशी संपर्क करेल. कागदपत्रे जमा केल्यानंतर 30 दिवसानंतर कंपनी पेमेंट देणे सुरू करील.