आदिनाथ कोठारेचं खास सरप्राईज! लवकरच ‘या’ वेबसीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार, दुहेरी भूमिका साकारणार…

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेने आठ पुरस्कार पटकावले.

Adinath Kothare Series Wins Eight Awards

Adinath Kothare Series Wins Eight Awards : निर्मिती विश्वात कोठारे व्हिजन हे नाव अगदी परंपरागत असलेलं नाव आहे. या निर्मिती संस्थने आजवर अनेक अफलातून आणि सुपरहिट कलाकृती घडवल्या. उत्तम प्रोजेक्ट उत्कृष्ट कथा घडवणाऱ्या कोठारे व्हिजनची सर्वोत्तम मालिका म्हणजे झी मराठीवरची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका.

आठ पुरस्कार

नुकताच झी मराठी पुरस्कार (Zee Marathi Awards) मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजन निर्मिती असलेल्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेने तब्बल आठ पुरस्कार (Adinath Kothare) पटकावले. सर्वोत्कृष्ट मलिका, नायक – नायिका , विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, बेस्ट कपल , लोकप्रियकुटुंब, मराठी झी 5 मोस्ट वॉच शो, अश्या आठ पुरस्कारांनी या मालिकेचा सन्मान करण्यात (Savalyachi Janu Savali) आला.

आदिनाथ पुन्हा दुहेरी भूमिका बजावणार

या सगळ्या सोहळ्यात अभिनेता आदिनाथ कोठारेने (Entertainment News) अजून एक मोठी घोषणा करून रसिक प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलं आहे. झी 5 मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच एका वेबशोची घोषणा केली आहे. अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका आदिनाथ या वेब सीरिजसाठी करणार असल्याचं कळतंय.

मराठी इंडस्ट्रीमधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन ‘धनंजय’ या वेब सीरिज ची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेब शो मधून उलगडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आदिनाथ पुन्हा दुहेरी भूमिका बजावणार असल्याचं कळतंय. निर्मिती आणि अभिनय या दोन्ही भूमिका, तो या सीरिज साठी करणार आहे.

बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग

या बद्दल बोलताना आदिनाथ सांगतो, एकीकडे आमची निर्मिती असलेल्या मालिकेला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळणं, हे गोष्ट आमच्यासाठी खूप खास आहे. त्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज हे पुरस्कार आम्हाला मिळाले आहे. प्रेक्षकांनी कायम आमच्यावर विश्वास दाखवला आहे. म्हणून आता वेब शोच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहोत. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एकीकडे अभिनेता म्हणून सुरू असलेला आदिनाथचा प्रवास तर दुहेरी भूमिका बजावत कायम उत्तम कलाकृतीची निर्मिती करून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स तो देतोय. येणाऱ्या काळात देखील आदिनाथ अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.

 

follow us