चाहत्यांसाठी गुडन्यूज! ‘धर्मवीर 2’चं जागतिक डिजिटल प्रीमियर लवकरच, ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE5 वर
Dharmaveer 2 Digital from October 25 : ZEE5 तर्फे ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer 2) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करण्यात येत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) आणि क्षितिश दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिश यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेत दिसतील. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ व साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षीत सिक्वेल ZEE5 वर स्ट्रीम केला जात आहे.
‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळतं. महेश लिमये यांची देखणी सिनेमेटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी आणि आनंद दिघे यांच्या वारशाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे.
अनिल देशमुखांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात; पवारांकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर
ZEE5 इंडियाचे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनीष कालरा म्हणाले, ‘’वैविध्यपूर्ण आणि गुंतवून ठेवणारा कंटेट देणारा प्लॅटफॉर्म या नात्याने धर्मवीर 2 प्रादेशिक सिनेमांच्या आमच्याकडे असलेल्या संग्रहात महत्त्वाची भर घालणारा आहे. याची कथा आजच्या राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे. आम्हाला खात्री आहे, की याची दमदार कथा आणि जबरदस्त अनुभव यांमुळे प्रेक्षकही खिळून राहतील. ZEE5 मध्ये आम्ही वास्तवादी गोष्ट असलेल्या कंटेटला प्राधान्य देतो. अस्सल व्यक्तीरेखांचा समावेश असलेला धर्मवीर 2 सिनेमा आमच्या त्याच बांधिलकीचे प्रतीक आहे.’’
दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले कू, ‘धर्मवीर सिनेमाचा सिक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास होता. चरित्रपट तयार करणं हे एक सुंदर आव्हान असतं. मी तो करताना आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वांशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक राहात खिळवून ठेवणारी गोष्ट सांगण्याचं ध्येय ठेवलं होतं. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम खऱ्या अर्थाने समाधान देणारं आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आणि अभिनय कौतुकास्पद आहे. या सिनेमानं इतिहास घडवला. ZEE5 वर त्याचे प्रीमियर होत असून हा प्रवास जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम यापुढेही वृद्धींगत होत राहील, अशी मला आशा वाटते.’’
आनंद दिघे साहेब यांची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसाद ओक म्हणाले की, ‘’आनंद दिघे साहेबांची व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी आव्हानात्मक आणि आयुष्य बदलवणारा अनुभव होता. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम व आशीर्वाद भारावून टाकणारा होता.
पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदमांचा पत्ता कट, दुसरा कोण दिला उमेदवार?
मला आशा आहे, की ZEE5 वर सिनेमाच्या जागतिक प्रीमियरलाही असाच भारावणारा प्रतिसाद मिळेल. अशाप्रकारच्या लक्षणीय, लोकप्रिय आणि सर्वांच्या कौतुकाचा विषय असलेली आनंद दिघे साहेब यांच्यासारखी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी सन्माननीय आहे. आतापर्यंतच्या करियरमध्ये मला विविध भूमिका साकारायला मिळाल्या, पण ही व्यक्तिरेखा माझ्या सर्वात जवळची आहे आणि तिनं मला वेगळीच ओळख मिळवून दिली. आनंद दिघे साहेब यांचा विलक्षण प्रवास जगभरातील प्रेक्षकांसमोर उलगडत असल्याचा मला खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकांना ‘धर्मवीर 2’ केवळ ZEE5 वर येत्या 25 ऑक्टोबरपासून पाहाता येईल.’’