SIP Investment : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी. मुच्युअल फंडात (Mutual Fund) नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग. युवा गुंतवणुकदारात एसआयपी जास्त (SIP Investment) लोकप्रिय आहे. जर तुम्ही सुद्धा एसआयपीच्या माध्यमातून मुच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही दीर्घ काळात एक चांगला फंड तयार करू शकता.
एसआयपीच्या माध्यमातून मुच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने एक फ्लेक्झिबल आणि नियमित गुंतवणुकीची (Investment Tips) संधी मिळते. जर तुम्ही तरुण आहात आणि दीर्घ काळासाठी पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एसआयपी तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही 40 वर्षांपर्यंत दरमहा 10 हजार रुपये गुंतवणूक केली तर तुमच्याकडे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा होतील.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण
म्युच्युअल फंडातील परतावा बाजारातील चढ उतारानुसार बदलत राहतो. परंतु मागील काही काळापासून 12 टक्के वार्षिक परतावा मिळत आहे. या रिटर्नच्या आधारे तुम्ही दहा कोटी रुपयांचा फंड कसा जमा करू शकता हे समजून घेऊ
समजा तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये गुंतवणूक 40 वर्षांपर्यंत कराल तर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम 48 लाख रुपये इतकी असेल. अनुमानित 12 टक्के परतावा मिळाल्यावर मुदत संपल्यानंतर तुम्हाला 11 कोटी 88 लाख रुपये मिळतील. MPNI या फॉर्म्युला वर एसआयपीचे calculation करता येते. M म्हणजे मॅच्युरिटी वेळी मिळणारी रक्कम, P म्हणजे दरमहा गुंतवणूक केली जाणारी रक्कम, N म्हणजे गुंतवणुकीची संख्या (महिन्यामध्ये), आणि I म्हणजे व्याजाचा दर. M=Px{[1+i]^n-1}/ix(1+i) या फॉर्म्युल्याच्या आधारावर तुम्ही एसआपी कॅल्क्यूलेशन करू शकता.
होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!