Download App

होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!

तुम्ही सुद्धा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकांकडून कोणकोणते चार्जेस आकारले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.

Bank Charges for Home Loan : घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण पैशांची बचत करतो पण बऱ्याचदा आपल्याला घर घेण्याचा बेत पुढे ढकलावा लागतो. यामागे सर्वात मोठं कारण पैशांची कमतरता हेच असतं. अशा वेळी होम लोन आधार (Home Loan) देणारं ठरतं. होम लोनच्या मदतीनं घराचं स्वप्न प्रत्यक्षात येतं खरं पण या कर्जाचे हप्ते (Loan Installment) नियमित भरण्याची मोठी जबाबदारी देखील पार पाडावी लागते. जर तुम्ही सुद्धा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नियम आणि अटींबरोबरच बँका आणि वित्तीय संस्थांकडून कोणकोणते चार्जेस आकारले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.

अर्जाचे शुल्क

जेव्हा केव्हा तुम्ही होम लोन घेण्यासाठी अर्ज करता त्यावेळी तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात. जर काही कारणांमुळे तुम्हाला कर्ज मिळालं नाही तरी तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला परत (Refund) मिळत नाहीत. त्यामुळे कर्ज घेण्याआधी तुम्हाला कोणत्या फायनान्स किंवा बँकेकडून कर्ज घ्यायचं आहे हे आधीच ठरवून घ्या असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. या गोष्टीचा आधी विचार करा अर्ज शुल्काच्या नावाखाली बँका मोठी रक्कम वसूल करतात.

कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सवर अवलंबून राहू नका, पर्सनल इन्शुरन्सही घ्या; जाणून घ्या, काय आहे गणित?

मॉर्गेज डीड चार्ज

होम लोन निवड करताना मॉर्गेज डीड चार्ज खूप महत्त्वाचा असतो. हा गृह कर्जाच्या टक्क्यांच्या आधारे घेतला जातो. काही बँका आणि एनबीएफसी हा चार्ज घेत नाहीत. तरी देखील हा मॉर्गेज डीड चार्ज नेमका काय आहे, कशासाठी आकारला जातो याची माहिती स्वतःहून करून घ्या. कारण बँका किंवा वित्तीय संस्थांमधले प्रतिनिधी या गोष्टी संबंधित कर्जदाराला सांगत नाहीत असा अनेकांचा अनुभव आहे.

कायदेशीर शुल्क

लोन धारकाच्या अर्जानंतर बँक किंवा वित्तीय संस्था बाहेरच्या वकिलांची नियुक्ती करतात. हे वकील कर्जधारकाची प्रॉपर्टी आणि कायदेशीर स्थिती काय आहे याची तपासणी करतात. यासाठीची वकिलांची फी ग्राहकालाच भरावी लागते. जर तुम्हाला ही फी भरायची नसेल तर तुम्ही आधीच माहिती करून घ्या की तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करत आहात त्यांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून मंजुरी मिळाली आहे किंवा नाही.

प्रीपेमेंट चार्ज

अनेकदा काही जण पैसे आले की कर्ज मुदतीच्या आधी मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. आपल्याकडील कर्जाचा एक मोठा हिस्सा पैशांच्या रुपात वेळेआधीच भरून टाकतात. कर्जातून लवकर मोकळं व्हायचं अशी भावना यामागे असते. परंतु, यामुळे बँकांना व्याज गमवावे लागते. परंतु, हे व्याज गमवावे लागू नये म्हणून या मंडळींनी एक नवी शक्कल प्रीपेमेंट चार्जच्या माध्यमातून शोधून काढली आहे. अशा स्थितीत बँक कॉस्ट आणि होणारे व्याजाचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रीपेमेंट चार्ज किंवा पेनल्टी आकारली जाते. वेगवेगळ्या बँकांत हा चार्ज वेगवेगळा असतो. कर्जाच्या प्रकारावर देखील हे अवलंबून असते.

कमिटमेंट फिस

अनेक बँक त्यांच्या गृह कर्जदारांकडून कमिटमेंट फी वसूल करतात. हा चार्ज अशा वेळी वसूल केला जातो ज्यावेळी कर्जदार ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत कर्जाचा भरणा करत नाही. खरंतर ही फी अवितरित कर्जावर आकारली जाते.

एलआयसीकडे 881 कोटी रुपये धुळखात, अद्याप कोणीच केला नाही दावा, ते तुमचे तर पैसे नाहीत ना?

‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा

1. होम लोन साठी अर्ज करण्याआधी विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांचे काय व्याजदर आहेत. तसेच त्यांच्याकडून कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत याची माहिती करून घ्या.

2. तुम्ही तुमच्या बजेटनुसारच कर्ज घ्या. जर तुम्ही मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं तर या कर्जाची परतफेड करणे तुम्हाला कदाचित अडचणीचे ठरू शकते. तेव्हा तुमच्या बजेटचा विचार करूनच कर्ज घ्या.

3. होम लोनसाठी अर्ज करण्याआधी व्याजदर आणि बचत यांसह अन्य महत्त्वाच्या गोष्टींचे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून घ्या. कर्जामुळे तुमचे आर्थिक नियोजन कोलमडून पडेल अशी वेळ येणार नाही याचीही काळजी घ्या. बऱ्याचदा असे होते की पगार आणि सेविंग केलेल पैसे देखील कर्जाचे हप्ते भरण्यात खर्च होऊन जातात. त्यामुळे बाकीचा आवश्यक खर्च करण्यासाठी पैसे शिल्लक राहत नाहीत.

4. कर्जाच्या अॅग्रीमेंटवर सही करण्याआधी कर्जाच्या नियम आणि अटी काय आहेत हे व्यवस्थित वाचून घ्या. जर एखादा नियम तुम्हाला समजत नसेल तर किंवा एखाद्या अटीत काही बदल करायचा असेल तर वेळेआधीच करता येईल.

follow us