एलआयसीकडे 881 कोटी रुपये धुळखात, अद्याप कोणीच केला नाही दावा, ते तुमचे तर पैसे नाहीत ना?
LIC Policy Maturity Claim: खिशात पैसा (Money) म्हणजे जीवनाला आधार असतो. पैशावाचून अनेकदा अडत, त्यामुळेच एक-एक रुपया मिळवण्यासाठी लोक आयुष्यभर राब राब राबतात. मात्र, कोट्यावधी रुपये कुठंतरी बेवारस पडून आहेत, असं तुम्हाला सांगितलं तर खोट वाटेल. पण हे खरंय. एलआयडीसकडे (LIC) थोडे-थोडके नाही तर तब्बल 881 कोटी धुळखात पडून असल्याची माहिती समोर आली.
हे कपडे घे अन् तूला आमदार व्हायचंय; वडिलांबद्दल सांगताना आमदार अभिजित पाटील भावूक
एलआयसीची ( (LIC) 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 880.93 कोटी रुपयांची दावा न केलेली मॅच्युरिटी रक्कम (Maturity amount) आहे. सरकारी माहितीनुसार, एकूण 372,282 पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटी बेनिफिटचा दावा केलेला नाही. म्हणजेच पॉलिसी मॅच्युअर होऊन 3 वर्ष झाले तरीही त्यावर कोणी दावा केलेला नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील कोणीतरी एलआयसी पॉलिसी घेतली आहे, जी मॅच्युअर झालीये, परंतु, पैसे मिळालेले नाहीत. तर तुम्ही त्या पॉलिसीच्या रकमेवर दावा करू शकता.
LIC मध्ये दावा न केलेली मॅच्युरिटी कशी शोधायची ते पाहूया…
1. LIC वेबसाइट https://licindia.in/home ला भेट द्या
2. मुख्यपृष्ठावरील ग्राहक सेवा या पर्यायावरवर क्लिक करा.
3. त्यानंतर Unclaimed Amount या पर्यायावर जाऊन रक्कम पर्याय निवडा.
4. मग पॉलिसी क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक हे तपशील भरा.
5. यानंतर तुम्हाला अनक्लेम मॅच्युरिटी असलेल्या पॉलिसींची माहिती मिळेल.
रकमेवर दावा कसा कराल?
कोणत्याही एलआयसी कार्यालयातून दावा फॉर्म मिळवा किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा. फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जसे की पॉलिसी दस्तऐवज, प्रीमियम पावत्या आणि लागू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र संलग्न करा. भरलेला फॉर्म कागदपत्रांसह LIC कार्यालयात जमा करा. एलआयसी तुमच्या दाव्याचे पुनरावलोकन करेल आणि मंजूर झाल्यास तुमची दावा न केलेली रक्कम जारी करेल.
25 कोटींहून अधिक लोकांकडे LIC पॉलिसी
1956 पर्यंत 154 भारतीय विमा कंपन्या, 16 विदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह संस्था भारतात कार्यरत होत्या. 1 सप्टेंबर 1956 रोजी सरकारने या सर्व 245 कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC सुरू केले. सध्या 25 कोटींहून अधिक लोकांकडे LIC पॉलिसी आहेत.