एलआयसीची चांदी! 3 महिन्यात नफ्यात अडीच टक्के वाढ, कंपनी शेअर्सवर देणार ‘इतका’ लाभांश
LIC Profit Increase : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी. या एलआयसीवर देशभरातील लोकांचा विश्वास आहे. याच एलआयसीने वर्षभराच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. त्याचा परिणाम म्हणून 2024 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफ्यात अडीच टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच नफा तब्बल 13 हजार 762 कोटी रुपयांनी वाढला आहे. मागील वर्षात याच काळात कंपनीचा नफा 13 हजार 427 कोटी रुपये इतका होता. यामुळे कंपनीने शेअरधारकांना लाभांश जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रति शेअर सहा रुपये लाभांश दिला आहे. कंपनीने सोमवारी चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला.
RBI Policy : कर्जदारांसाठी मोठी बातमी! कर्ज हप्त्याचा व्याजदर ‘जैसे थे’ EMI वाढणार नाही
एलआयसीच्या शेअर्समध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या शेअर्समध्ये काल 0.77 टक्के वाढ झाली. हे शेअर्स काल 1037 रुपयांवर बंद झाल. मागील वर्षभराज्या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 71.46 टक्के इतका परतावा दिला आहे. कंपनीचा 2024 या आर्थिक वर्षातील पूर्ण नफा 11.75 टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षात 36 हजार 397 कोटी रुपये इतका नफा होता. तो या वर्षात 40 हजार 675 कोटी रुपये झाला आहे.
कंपनीच्या व्यवहाराबद्दल बोलायचे झाले तर एलआयसीने 2024 या आर्थिक वर्षात तब्बल 2.03 कोटी पॉलिसींची विक्री केली. मागील 2023 या वर्षात हा आकडा 2.04 कोटी होता. कंपनीच्या व्यवस्थापनातील मालमत्तांचे मूल्य वाढले आहे. या मालमत्ता 43.97 लाख कोटींवरून 51.21 लाख कोटी झाल्या आहेत. म्हणजेच या मालमत्तांत 16.48 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आयडीबीआय बँक लिमिटेड, एलआयसी म्युच्युअल फंड ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेड, एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिस लिमिटेड, एलआयसीएचएफएल मालमत्ता व्यवस्थापन कंपनी लिमिटेड या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहा सहाय्यक कंपन्या आहेत. कंंपन्यांचे निकाल दोन भागात येतात. त्यातील एक स्वतंत्र आणि दुसरा एकत्रित प्रकारात असतो. स्वतंत्र अहवालात कंपनीच्या एका युनिटची आर्थिक कामगिरी सांगितली जाते तर एकत्रित अहवालात संपूर्ण कंपनीची कामगिरी सविस्तर सांगितली जाते.
मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार टक्कर