मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार टक्कर
Reliance Industries : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी घोषणा केली आहे. लवकरच Jio Financial Services कंपनी विमा क्षेत्रात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या कंपनीचे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे आणि शेअर बाजारात तिची लिस्ट करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस केवळ आयुर्विमा विकणार नाही, तर सामान्य विमा आणि आरोग्य विम्याशी संबंधित उत्पादनेही विकणार आहेत.
एलआयसीला देणार टक्कर
रिलायन्स इंडस्ट्रीज ही सध्या देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याचवेळी, त्यांच्या Jio Financial Services चा देशातील टॉप-5 वित्तीय कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी विमा मार्केट लीडर लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया (LIC) तसेच HDFC Life, ICICI प्रुडेन्शियल इत्यादी कंपन्यांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.
अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी
भविष्याचा विचार करून मुकेश अंबानींनी हा व्यवसाय डिजिटली प्रगत करण्याबाबत बोलले आहे. त्याच वेळी, बाजारात वाढ निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी भागीदारी करण्याची शक्यता देखील व्यक्त केली गेली आहे. ते म्हणाले की, ही कंपनी डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून ग्राहकांसाठी संकल्पना-आधारित विमा उत्पादने विकसित करेल, जी ग्राहकांच्या फायद्यांना लक्षात घेऊन तयार केली जाईल.
खाशाबा जाधवांचा जन्मदिवस ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Jio AirFiber लाँच होणार
एजीएममध्येच मुकेश अंबानी यांनी जिओ एअरफायबर सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, जिओ एअरफायबरची सेवा देशात 19 सप्टेंबरपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून सुरू होईल. त्याच्या मदतीने लोकांना घरापासून ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणी हायस्पीड इंटरनेटची सुविधा मिळेल. ही एक वायरलेस सेवा असेल जी हाय-स्पीड इंटरनेटसाठी घरांमध्ये केबल टाकण्याचा आणि लाईन टाकण्याचा त्रास दूर करेल.