Adani Group : एलआयसीची गुंतवणूक नियमांनुसारच, सरकारकडून राज्यसभेत स्पष्टीकरण

  • Written By: Published:
Adani Group : एलआयसीची गुंतवणूक नियमांनुसारच, सरकारकडून राज्यसभेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिपोर्ट (Hindenburg Research) पब्लिश झाल्यांनतर अदानी समूहाला (Adani Group) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील याचा मोठा फटका बसला. परिणामी अदानी ग्रुपमधील सरकारच्या गुंतवणूकीवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले. चालू असलेल्या अधिवेशात देखील विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आज सरकारकडून स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा :   पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची जोरदार चर्चा, नेमकं कारण काय?

अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना उत्तरात सांगितले की, एलआयसीने (LIC) अदानी समूहात ३५ हजार ९१७ काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीकडे एकूण ४१.६६ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी हा केवळ ०.९ टक्केच हिस्सा असल्याचे एलआयसीने स्पष्ट केले हाेते.

याच उत्तरात पुढे सांगताना कराड यांनी सांगितले आहे की, गुंतवणूक करताना विमा कायदा आणि ‘इरडा’च्या गुंतवणूक नियममनांचे काटेकाेरपणे पालन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून करण्यात आलेली गुंतवणूक ही योग्य आहे. असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube