मुलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरीही अपयश; पहिल्याच चित्रपटात फ्लॉप!
Bollywood News : बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांची मुलं देखील त्यांचं अनुसरण करून चित्रपटात नशीब आजमावतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप ठरतात. हिंदी सिनेमात अशा (Bollywood News) पिता पुत्रांच्या जोड्या कमीच आहेत ज्या यशस्वी ठरल्या आहेत. बॉलीवूडचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन वडिलांच्या (Abhishek Bachchan) आसपास देखील नाही. अभिषेकने जितक्या सिनेमांत अभिनय केला आहे त्यातील एखादाही सिनेमा हिट ठरल्याचे कुणाच्या ऐकिवात नाही. अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरलाही प्रेक्षकांनी आघाडीचा अभिनेता म्हणून स्वीकारलं नाही.
सत्तरच्या दशकातील सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना चित्रपटात (Akshaye Khanna) विशेष काही करू शकला नाही. अक्षयला बॉलीवूडमध्ये लाँच करण्यासाठी विनोद खन्ना यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. अक्षयच्या पहिल्या चित्रपटासाठी विनोद खन्ना यांनी भरपूर पैसे खर्च केले होते. त्यावेळचे बेस्ट डायरेक्टर आणि सर्वात यशस्वी संगीत दिग्दर्शक यांना चित्रपटाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पंकज पराशर निर्देशित आणि हनी इराणी-अनु मलिक लिखित संगीत असतानाही अक्षय खन्नाचा डेब्यू सिनेमा ‘हिमालय पुत्र’ सपशेल फ्लॉप ठरला होता. प्रचंड पैसे खर्च केल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाला रीजेक्ट केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर यांनी नुकताच एका मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला. पराशर म्हणाले अक्षयला बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून स्थापित करण्यासाठी विनोद खन्ना यांनी भरपूर मेहनत घेतली. मुलाला चित्रपट सृष्टीत पदार्पण करवण्यासाठी एका दिग्दर्शकाच्या शोध घेत असल्याचे विनोद खन्ना यांनी मला फोनवर सांगितले होते अशी आठवणही पराशर यांनी यावेळी सांगितली.
विनोद खन्ना यांनी माझ्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. चित्रपटात एक प्रेम कथा असेल. अनु मलिक यांचे संगीत असेल आणि हनी इराणी गाणे लिहितील. मी निघणार असताना त्यांना विचारलं मी त्याला पाहू शकतो का कारण याआधी मी अक्षयला कधीच पाहिलं नव्हतं.
पराशर पुढे म्हणाले, अक्षय एक चांगला अभिनेता आहे. पण हिंदी भाषेची त्याची सर्वात मोठी अडचण होती. अक्षय इंग्लिशमध्ये विचार करत असायचा. हिंदीसाठी मात्र संघर्ष करताना दिसायचा. कारण त्याची हिंदी इतकी चांगली नव्हती. तरीही तो एक नैसर्गिक अभिनेता आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याला काही संवाद म्हणायला दिला त्यावेळी त्याने चांगला परफॉर्मन्स दिला होता.
प्रचंड मेहनत आणि पैसे खर्च केल्यानंतर सुद्धा विनोद खन्ना आपला मुलगा अक्षय खन्ना याला लाँच करू शकले नाहीत. मात्र कालांतराने अक्षयच्या करिअरने वेग घेतला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारली. पण अचानक त्याचे करिअर पुन्हा गडगडले. आता सध्याच्या परिस्थितीत अक्षय चित्रपटांत फक्त साईड रोल करताना दिसत आहे.
मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अमेरिकेत अटक, नक्की काय आहे प्रकरण?