मराठीत आणखी एक दमदार सिनेमा; “आता थांबायचं नाय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठीत आणखी एक दमदार सिनेमा; “आता थांबायचं नाय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे.

हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय ‘झी स्टुडिओज’ ही संस्था पुढे आली आहे. त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत. या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत.

आज ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त किरण दिघावकर, झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश बन्सल, झी स्टुडिओजचे बिजनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालिया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाला. यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ; ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं ही गोष्ट झी स्टुडिओजसाठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे असे मत चीफ बिजनेस हेड उमेश बन्सल यांनी व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून मराठीत पहिल्यांदाच अशा प्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत असे झी स्टुडिओजचे बिजनेस हेज बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात. चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अशा प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच मला महापालिकेच्यावतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय असे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी खरंच काय करू शकतात याची चुणूक दाखवणारी आमच्या गुणी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणारी कलाकृती तयार होतेय याचा आनंद आहे असे मत मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केले.

‘गुम है किसी के प्यार में’मध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, साकारणार महत्वाची भूमिका

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे असे महापालिकेचे निवृत्त सनदी अधिकारी उदयकुमार शिरुरकर यांनी व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा त्यासाठी झी स्टुडिओ सहकारी आणि मुंबई महानगरपालिका यांचे योगदान असल्यानेच ‘आता थांबायचं नाय’ शक्य झाले आहे असा विश्वास चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी यांनी व्यक्त केला.

चित्रपट – ‘आता थांबायचं नाय’
दिग्दर्शक – शिवराज वायचळ
निर्माते :
झी स्टुडिओज – उमेश के बन्सल आणि बवेश जानवलेकर
चॉक अँड चीज प्रॉडक्शन – निधी परमार – हिरानंदानी
क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी
फिल्म जॅझ – धरम वालीया
लेखक – शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप
कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे
आणि आशुतोष गोवारीकर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube