VIDEO : पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान चाहत्यांची तुंबळ गर्दी; चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू, 2 जखमी

Pushpa 2 Premire Stampede Women Dead Two Injured In Hyderabad : देशभरातली चाहत्यांमध्ये अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मोठी क्रेझ आहे. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहते खूपच गर्दी करतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटाच्या (Pushpa 2) घोषणेनंतर चाहत्यांमध्ये त्याची मोठी क्रेझ दिसून आली. ट्रेलर रिलीज आणि मध्येच येणारे त्याचे पोस्टर्स यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली होती.
आता अखेर आज त्रपटगृहात प्रदर्शित (Entertainment News) झालाय. सकाळपासूनच चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. हैदराबादमध्ये रिलीज होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
महायुतीत मंत्रिपदावरून घोडं अडलं? आज फक्त तिघांचाच शपथविधी, कारण…
पुष्पा 2 प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुनही यावेळी थिएटरमध्ये उपस्थित होता. मात्र, तारेवरची कसरत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले. अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सौम्य लाठीमारही केला.
राज्यात नव्या सरकारचा आज ग्रॅंड शपथविधी सोहळा, देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
रेवती असं या चेंगराचेंगरीत मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देखील केले, परंतु त्यांना वाचवता आलं नाही. खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. जखमी मुलालाही रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, गर्दीत अडकल्यावर ती महिला आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले.
View this post on Instagram
या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो ब्लॉकबस्टर ठरला. त्याचवेळी चाहते आणि निर्मात्यांना दुसऱ्या भागाकडूनही तशीच अपेक्षा आहे. ॲडव्हान्स बुकिंग आणि कलेक्शन पाहता हा चित्रपट 100 कोटींहून अधिकची ओपनिंग घेऊ शकतो, असे बोलले जात आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे, जो बंगाली भाषेतही प्रदर्शित झाला आहे.