Download App

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) आज गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1,064.12 अंकांनी 

  • Written By: Last Updated:

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) आज गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1,064.12 अंकांनी घसरून 80,684.4 वर बंद झाला आणि निफ्टी 332.25 अंकांनी किंवा 1.35 टक्क्यांनी घसरून 24,336 वर बंद झाला.

आज प्रमुख धोरणात्मक निर्णय, विशेषत: यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) निर्णयापूर्वी भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात बंद झाला आहे. त्यामुळे निफ्टीच्या पीएसयू बँक, ऑटो, आयटी, फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा, एफएमसीजी, मेटल आणि रियल्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली.

माहितीनुसार, यूएस फेड, बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंड यांच्या प्रमुख धोरणात्मक निर्णयांपुढे सर्वच क्षेत्रात निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निफ्टी बँक 746.55 अंकांनी घसरून 52,834.80 वर बंद झाला.

निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 341.15 अंकांनी घसरून 59,101.90 वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 132.60 अंकांनी  घसरून 19,398.45 वर बंद झाला.

राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात

आज कोणते शेअर्स घसरले?

आज बीएसईवर तब्बल 2,440 शेअर्स घसरले तर सेन्सेक्स पॅकमध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, एशियन पेंट्स, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, मारुती, एम अँड एम, टाटा स्टील आणि पॉवर ग्रिडमध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान झाले.  तर दुसरीकडे आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 84.90 च्या जवळ आला आहे.

एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये

follow us