अदाणींवरील आरोपानंतर मोठी सेन्सेक्स-निफ्टीत उलथापालथ; शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय? घ्या जाणून
Gautam Adani Bribery Allegations In America : भारतातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीमध्ये गौतम अदाणी (Gautam Adani) यांचं नाव आहे. अदाणींवर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. अदाणींवरील आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ (Share Market News) झाली होती. अदाणी उद्योग समूहाचे सर्व कंपन्यांचे शेअर्स 21 नोव्हेंबर रोजी पडले होते. परंतु आज शेअर बाजारात काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळतेय. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजराच्या निफ्टी निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे.
काल 21 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार (Stock Market) मोठ्या प्रमाणात पडला होता. त्यानंतर आज बाजार सावरल्याचं दिसतंय. सेन्सेक्स व्यवहार सुरू झाल्यानंतर 185 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीत 60 अंकांची वाढ झालीय. सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झालेली आहे. मात्र अदाणी उद्योग समुहासोबत संबंधित असलेल्या कंपन्यांच्या समभागाची विक्री मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अदानी पोर्ट, अदानी ग्रीन आणि अदानी पॉवर या कंपन्यांच्या समभागांत देखील घसरण झालेली आहे.
Exit Poll : जनतेच्या मनातला CM कोण? शिंदे, फडणवीस, दादा की नाना? आश्चर्यकारक माहिती..
अदानी कंपनीच्या स्टॉक्सची सध्या स्थिती काय आहे, ते आपण जाणू घेऊ या. आज सकाळी शेअर बाजार सावरला आहे. परंतु अदानी उद्योग समूहाच्या कंपन्या अजून देखील लाल निशाणीवर असल्याचं पाहायला मिळत (Gautam Adani Bribery Allegations) आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्स कंपनीचा शेअर 5.93 टक्क्यांनी घसरला. तो सध्या 656.50 रुपयांवर आलाय. अदानी विल्मर या कंपनीचा शेअर 3.19 टक्क्यांनी घसरून 285.55 रुपयांवर आलाय आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर सध्या 1063 रुपयांवर आलाय. यामध्ये 7.62 टक्क्यांची घसरण झालीय. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये 3.22 टक्क्यांची घसरण झालीय. सध्या हा शेअर 1076.55 रुपयांवर आहे.
महायुती-मविआ अलर्ट! मॅरेथॉन बैठका, हॉटेल खोल्या अन् स्पेशल विमाने बुक, स्ट्रॅटेजी काय?
अदानी एंटरप्रायझेस हा शेअर देखील 3.51 टक्क्यांनी कमी झालाय. त्याची किंमतही 2014.10 रुपयांपर्यंत घसरली आहे. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरमध्ये देखील 2 टक्क्यांची घसरण झालीय. सध्या हा शेअर 590.25 रुपयांवर आहे. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील 2.56 टक्क्यांनी घसरलेले आहे. सध्या हा शेअर ृ463 रुपयांवर आहे.गौतम अदानी यांनी अमेरिकेत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेतील आरोपांनंतर आता अदानी उद्योग समूह कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई करणार आहे.