वायनाडमध्ये आज घमासान! प्रियंका गांधी अर्ज भरणार; काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
Wayanad Bypolls : केरळमधील वायनाड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत चुरस (Wayanad Bypolls) निर्माण झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रियंका गांधी आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी एक मोठा रोड शो आयोजित करण्यात आल आहे. या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी सोनिया गांधी देखील वायनाडमध्ये दाखल झाल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.
काँग्रेसची रणनीती काय?
स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रचाराची रणनीती आखली आहे. 26 आणि 27 ऑक्टोबर या काळात घरोघर जाऊन प्रचार केला जाणार आहे. प्रियंका गांधींची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्या स्वतः जनतेत जाऊन मते मागताना दिसतील. प्रियंकांना राजकारणात येऊन फार काळ झालेला नाही. 2019 मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेश काँग्रेससाठीही मोठं काम त्यांनी केलं होतं.
कोण आहेत भाजपाच्या उमेदवार हरिदास
भारतीय जनता पार्टीने केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघात नव्या हरिदास यांना तिकीट दिले आहे. नाव्या हरिदास मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. सन 2007 मध्ये केएमसीटी इंजिनीरिंग कॉलेज कालीकट युनिव्हर्सिटी येथून त्यांनी बीटेक पदवी प्राप्त केली. ADR नुसार हरिदास यांच्यावर कोणताही खटला दाखल नाही. त्यांच्याकडे एकूण 1,29,56,264 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलनुसार हरिदास कोझिकोड पालिकेत नगरसेवक आहेत. सध्या भाजप महिला मोर्चा राज्य महासचिव आहेत. फेसबुक पेजवर हरिदास स्वतः ला भाजप संसदीय गट नेता आणि बीजेएमएसच्या राज्य महासचिव म्हणवतात.
राज्यपाल पदासाठी यूपी अन् दक्षिण भारतच फेव्हरेट; बिगर भाजप नेत्यांनाही लॉटरी..
दरम्यान काँग्रेसने जून महिन्यातच स्पष्ट केले होते की वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) काही दिवसानंतर जून महिन्यात काँग्रेसने (Congress Party) घोषणा केली होती की राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतील खासदारकी कायम ठेवतील आणि वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देतील. आता या मतदारसंघातील लढत स्पष्ट झाली आहे.
यंदा ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात आहे. कारण प्रियंका गांधी काँग्रेससाठी महत्वाच्या नेत्या आहेत. तर नव्या हरिदास भाजपसाठी युवा आणि एक चांगला पर्याय मनाला जात आहे. मतदारसंघातील तरुण मतदारांचा विचार करून भाजपने हरिदास यांना तिकीट दिले आहे. नव्या यांना भाजपने एक सशक्त आणि महिला नेत्याच्या रुपात सादर केले आहे. युवक आणि महिलांचे प्रश्न घेऊन त्या निवडणुकीत उतरल्या आहेत.
कोण आहेत सत्यन मोकेरी
राज्यातील सत्ताधारी एलडीएफने या निवडणुकीत वरिष्ठ सीपीआय नेते सत्यन मोकेरी यांना तिकीट दिले आहे. कोझीकोड जिल्ह्यातील नादापुरम मतदारसंघातील माजी आमदार मोकेरी कृषी क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांसाठी ओळखले जातात. मोकेरी यांनी 2014 मध्ये वायनाड मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. मोकेरी सध्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि केरळ राज्य समितीचे पूर्व सहायक सचिव आहेत.
Rahul Gandhi: हे मोदी अन् भाजप सरकार नसून अदानी अन् अंबानी सरकार; राहुल गांधींचा घणाघात