Download App

Lok sabha Election : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते ‘रणसंग्राम’, BJPची दोन खासदारांना पुन्हा उमेदवारी

  • Written By: Last Updated:

BJP Mahrashtra Second Candidate List : महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाहीत. अनेक जागांचा तिढा आहे. परंतु भाजपने (BJP) राज्यातील तीन जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. सोलापूर (एससी) राखीव मतदारसंघातून आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या आमदारप्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याशी होणार आहे. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. भंडारा-गोंदियातून पुन्हा खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघात अशोक महादेवराव नेते यांना तिकीट मिळाले आहे. नेते हे दोन टर्म भाजपचे खासदार आहेत. ही जागा अजित पवार हे मागत होते. त्यांना येथून मंत्री बाबा आत्रम यांना रिंगणात उतरायचे होते. परंतु भाजने ही जागा आपल्याकडेच ठेवली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता


भंडारा, गडचिरोलीत अशा लढती होणार

भंडारा-गोंदियामध्ये कालच काँग्रेसने प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे सध्याचे खासदार सुनील मेंढेविरुद्ध पडोळे अशी लढत होणार आहे. तर गडचिरोलीतून काँग्रेसचे नामदेव किरसान हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने अशोक महादेवराव नेते यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. विदर्भातील अनेक मतदारसंघांतील चित्र आता स्पष्ट झाले आहे. विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.

भाजपच्या आतापर्यंत तेवीस जागा जाहीर

महायुतीमध्ये अनेक जागांबाबत तिढा सुटलेला नाही. परंतु आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत.पहिल्या यादीत वीस मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या यादीत तीन लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. आतापर्यंत भाजपने तेवीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील अधिक जागा या विदर्भातील आहेत.

बच्चू कडू नवनीत राणांचं गणित बिघडविणार? राज्यात युती पण अमरावतीत..,


जागा वाटप कसे होणार ?

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. तर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हेही युतीमध्ये असणार हे आज नक्की झाले आहेत. त्यांच्या पक्षाला एका जागा दिली जाणार आहे. आता ही जागा बारामती की परभणी हे ठरणार आहे. महादेव जानकरांची जागा धरून आतापर्यंत चोवीस जागा नक्की झाल्या आहेत. आणखी 24 जागा बाकी आहेत. त्यातील शिंदे गटाकडे तेरा खासदार आहेत. त्यामुळे त्यांना किती जागा मिळतात. तर अजित पवार गटाला किती जागा मिळतात हे अद्याप निश्चित झालेले नाहीत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठका झालेल्या आहेत. त्यानंतर भाजपच्या राज्यातील दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. परंतु शिंदे गट व अजित पवार गटाची एकही यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी काहीशी गोंधळाची परिस्थिती आहे.

follow us