Download App

Loksabha Election : शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर

  • Written By: Last Updated:

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील सात जणांची उमेदवारी घोषित केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, कोल्हापूरमधून शाहू महाराज, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे.

Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी घोषित


पुण्यात धंगेकरविरुद्ध मोहोळ सामना

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात भाजपनंतर काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. पुण्यात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसबा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवणुकीत बाजी मारणारे रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता येथे धंगेकरविरुद्ध मोहोळ असा सामना रंगणार आहे.

नंदूरबार, लातूर, नांदेडला कशा लढती होणार ?

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नंदुरबारमध्ये भाजपच्या दोन टर्म खासदार हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी अशी लढत होणार आहे. तर नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकरविरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण अशी लढत होणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारेविरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे अशी लढत होणार आहे. तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्याविरोधात अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. या ठिकाणी शिंदे गटाचे संजय मंडलिक हे खासदार आहेत. परंतु येथून त्यांची अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही.

भाजपच्या आधी मारली बाजी

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूरमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. तर राखीव अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा या खासदार आहेत. त्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. परंतु त्यांना अद्याप भाजपने येथून उमेदवारी जाहीर केलेली नाही. ही जागेवर शिंदे गटाचे आनंदराव आडसूळ यांनी दावा सांगितला आहे.

मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejriwal यांच्या घरी ईडी धडकली

काँग्रेसची सात जणांची यादी जाहीर
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज-कोल्हापूर
रवींद्र धंगेकर-पुणे
सोलापूर-प्रणिती शिंदे
नंदुरबार-गोवाल पाडवी
अमरावती-बळंवत वानखेडे
लातूर-शिवाजी काळगे
नांदेड-वसंतराव चव्हाण


काँग्रेसची 57 जणांची तिसरी यादी

गुरुवारी काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसने 57 जणांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली. तर गुजरामधील 11, कर्नाटकातील 17, राजस्थानमधील सहा, पश्चिम बंगलामधील आठ, आंध्र प्रदेशमधील दोन जणांची उमेदवारी जाहीर केली.

follow us