Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी घोषित

Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी घोषित

Chandrahar Patil : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर झाल्या असून सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झालेले नाही. मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं कॉंग्रेस आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Holi 2024 : तुम्हाला माहितेय का? होळी आणि पुरणाची पोळी यांचं ‘हे’ पारंपारिक कनेक्शन 

11 मार्च चंद्रहार पाटील यांनी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यावेळी मोठ शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, आज ठाकरे गटाचा सांगलीत जनसंवाद मेळावा झाला. या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमदेवारी जाहीर केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी या उमेदवाराची घोषणा केली आहे.

चंद्रहार पाटील हे लोकसभा लढवणार यावर सुरुवातीपासूनच ठाम होते. गेल्या वर्षभरापासून ते लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. बैलगाडी शर्यत, रक्तदान शिबिर रॅली आणि गावोगाव संपर्क अभियान राबवून लोकसभा निवडणूक लढवण्याचा मानस त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.

Holi 2024 : तुम्हाला माहितेय का? होळी आणि पुरणाची पोळी यांचं ‘हे’ पारंपारिक कनेक्शन 

दरम्यान, यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता महा वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो, तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चुक झाली.काय दिलं नव्हतं, म्हणून खाऊन खाऊन पचन झालं नाही म्हणून पळून गेले. शिवसेना नसतील तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला ओलख तरी झाली असती का, असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे गट आणि कॉंग्रेसने या जागेवर दावा सांगिलता होता. ठाकरे गटाकदडून चंद्रहार पाटील हे लोकसभेची तयारी करत होते. तर काँग्रेसकडून विशाल पाटील हे तयारी करत होते. मात्र आज ठाकरेंना चंद्रहार पाटील यांनी लोसभेसभेची उममदेवारी जाहीर केली. त्यामुळं विशाल पाटीलयांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, आता सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमदेवारी ठाकरे गटाने जाहीर केल्यानं त्यावर आता कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज