Holi 2024 : तुम्हाला माहितेय का? होळी आणि पुरणाची पोळी यांचं ‘हे’ पारंपारिक कनेक्शन

Holi 2024 : तुम्हाला माहितेय का? होळी आणि पुरणाची पोळी यांचं ‘हे’ पारंपारिक कनेक्शन

Holi 2024 : होळी आणि पुरणाची पोळी ( Holi 2024 ) हे कनेक्शन आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. त्यामध्ये होळी रे होळी पुरणाची पोळी ह्या घोषणाही आपण अनेकदा दिलेल्या आहेत. मात्र आपल्यापैकी अनेकांना माहीतच नाही की होळी आणि पुरणाची पोळी यांचे पारंपारिक कनेक्शन आहे. काय आहे कनेक्शन पाहुयात…

मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejarival यांच्या घरी ईडी धडकली

राज्यभरात साजरा केला जाणारा होळी किंवा शिमगा हा सण वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने मिळवलेल्या विजयाचा आनंद म्हणून साजरा केला जातो. यावेळी होलीका दहन केले जाते. या अग्नीमध्ये सर्व वाईट गोष्टींचं दहन करून होळी साजरी केली जाते. तसेच या सणाला पुरणपोळीचा बेत घरोघरी केला जातो.

रामदास आठवलेंच्या कारला अपघात, वाईजवळ कंटेनरने दिली जोरात धडक

हे पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याचं कारण आपल्या पारंपारिक चालीरीती आणि शेतीमध्ये दडलेलं आहे. होळी हा सण येतो तो शेतीतील रब्बी हंगामाच्या शेवटी. तोपर्यंत शेतामध्ये हरभरा, गहू आणि ऊस ही सगळी पिकं होऊन गेलेले असतात. हरभऱ्याची डाळ झालेली असते. गहू घरात आलेला असतो. तसेच उसापासून गुऱ्हाळ्यांमध्ये गुळ देखील निर्माण झालेला असतो.

त्यामुळे हे सर्व धान्य घरात आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांकडून हे धान्य वापरण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. तो या होळी सणाच्या माध्यमातून. त्यामुळेच शेतामधून आलेल्या हरभरा गहू आणि उसापासून बनलेल्या गुळाचा पुरण म्हणजेच पुरणाची पोळी केली जाते. याचा नैवेद्य देवाला होळीला दाखवला जातो. अनेक ठिकाणी याला नव्याची पौर्णिमा देखील म्हटले जाते. म्हणूनच होळी आणि पुरणाची पोळी याचं पारंपारिक कनेक्शन आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube